आरोग्यताज्या बातम्या

देवा,आयसीयू तील जगण्याची लढाई पाहवत नाही…

मुंबई (बारामती झटका)

असं म्हणतात कि, हॉस्पिटलची पायरी चढू नये. मात्र, आजारपण काही कुणाला सांगून येत नाही. कधी अपघात घडेल आणि कधी कोणता आजार जडेल. किंवा कोण्या एका व्यक्तीला मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागेल याची पुसटशीही कल्पना नसते.

आपण नेहमी आपल्या कामात व्यस्त असतो, आपल्या कुटुंबासोबत नियमित आयुष्य जगत असतो. मात्र, त्याचवेळी शहरातील रुग्णालयाच्या आयसीयूत कुणाची आई तर कुणाचे बाबा किंवा जवळचा नातेवाईक मृत्यूशी झुंज देत असतात.

रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाचे नातेवाईक तो रुग्ण बरे होण्यासाठी देवाचा धावा करीत असतो. काही जण आपला नातेवाइक बरा व्हावा, म्हणून देवाला नवस करतात. काहीवेळा त्या संबंधित रुग्णाला इतक्या असह्य वेदना होत असतात की, त्याला त्यातून मुक्ती दे, अशी याचना देवाकडे करतानाचे नातेवाईक आयसीयूबाहेर दिवसभर बसून असल्याचे चित्र सर्वच मोठ्या रुग्णालयात पाहायला मिळते. सरकारी रुग्णालयात तर हे चित्र अधिकच भयाण असते.

रुग्ण ॲडमिट केल्यापासून ते तो सुखरूप घरी येईपर्यंत घरातील सर्वच काळजीत असतात. एकदा का तो घरी आला कि, सर्वजण सुटकेचा निश्वास सोडतात. खरंच, हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ कधीच कुणावर येवू नये.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button