Uncategorizedताज्या बातम्या

धक्कादायक ! अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापूरच्या हॉटेलमध्ये केली आत्महत्या

सोलापूर (बारामती झटका)

सोलापुरातील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरमधील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. स्नेहलता प्रभू जाधव असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. स्नेहलता या लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी होत्या. स्नेहलता यांनी हॉटेलच्या रुममध्ये साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. प्रभू जाधव हे यापूर्वी सोलापुरात जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी होते.

स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे १८ डिसेंबर लग्न रोजी होते. लग्नाच्या खरेदीसाठी त्या, त्यांचे पती व नातेवाईक कर्नाटकातील चडचण येथे गेले होते. शनिवारी रात्री उशीर झाल्याने ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमीत्त लातूरला गेले. दुपारी स्नेहलता यांनी आपल्या लातूर मधील नातेवाईकाला फोन करत जोरजोराने रडत आपण ‘आत्महत्या करणार’ असे सांगू लागल्या. यामुळे नातेवाईकांनी समजून सांगत या घटनेची माहिती सोलापुरातील नातेवाईकांना दिली.

जेमतेम दहा ते पंधरा मिनिटांनी सोलापुरातील नातेवाईक हॉटेलवर गेल्यानंतर हॉटेलचा दरवाजा बंद आढळला. यामुळे नातेवाईकांनी दरवाजा तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना लगेच उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, रात्री विजापूर नाक्याचे विलास घुगे, विशाल जाधव आदींनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. घटनेचा अधिक तपास विलास घुगे करत आहेत. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा झाली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

8 Comments

  1. Wow, wonderful blog format! How lengthy have you ever been blogging for?
    you made running a blog look easy. The total glance of your website is magnificent, as well as the content material!
    You can see similar here najlepszy sklep

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button