पंढरपूर आषाढी एकादशी वारी मेळ्यासाठी नागपूर-मिरज -नागपूर दरम्यान चार विशेष गाड्या चालविण्यात येणार

पंढरपूर (बारामती झटका)
आषाढी एकादशी निमित्त दि. ६ जुलै २०२५ रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या वारी मेळ्यादरम्यान यात्रेकरूंची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर आणि मिरज दरम्यान चार विशेष गाड्या (गाडी क्र. 01205/01206) चालविण्यात येणार आहेत. या गाड्या ट्रेन ऑन डिमांड (TOD) योजनेअंतर्गत @1.3 भाडे दर योजना राबवून चालविण्यात येतील.
महत्वाची माहिती –
गाडी क्र. 01205 (नागपूर – मिरज विशेष) दि. 04.07.2025 आणि 05.07.2025 रोजी सकाळी 08:50 वाजता नागपूर स्थानकावरून प्रस्थान करील व दुसऱ्या दिवशी 11:55 वाजता मिरज स्थानकावर आगमन करेल.
गाडी क्र. 01206 (मिरज – नागपूर विशेष) दि. 06.07.2025 आणि 07.07.2025 रोजी दुपारी 12:25 वाजता मिरज स्थानकावरून प्रस्थान करील व दुसऱ्या दिवशी 12:55 वाजता नागपूर स्थानकावर आगमन करेल.
मार्गातील थांबे – अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगर, अरग आणि मिरज.
कोच संरचना – 10 शयनयान डबे, 4 सामान्य श्रेणी डबे, 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे व 2 गार्ड-कम-लगेज डबे (SLRD), एकूण 18 डबे.
यात्रेकरूंनी प्रवासाची योग्य वेळी आखणी करून या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा. आरक्षणासाठी प्रवासी जवळच्या आरक्षण केंद्रात संपर्क साधू शकतात किंवा IRCTC च्या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षण करू शकतात.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



