ताज्या बातम्याराजकारण
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता ?, निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

नवी दिल्ली (बारामती झटका)
आज दुपारी मा. मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार यांनी पेंलरी हॉल, विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आज मंगळवार दि. १५/१०/२०२४ दुपारी ०३.३० वाजता महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यामुळे आज संपूर्ण निवडणूक कार्यक्रम घोषित होईल आणि आजपासूनच आदर्श आचारसंहिता अंमलात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तसे पत्रही आले आहे. आज दुपारीच्या पत्रकार परिषदेत कदाचित महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.