नंदुरबार जिल्हा परिषदेचा महाआवास अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत प्रमोदकुमार पवार यांनी पुरस्कार स्वीकारला.
मुंबई ( बारामती झटका )
पंतप्रधान आवास अभियान 2020-21 मध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्याला राज्य शासनातर्फे विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथे झालेल्या या सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात दि. 10 नोव्हेंबर 22 पासून पंतप्रधान अमृत महाआवास अभियान 2022-23 राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला. या कार्यक्रमप्रसंगी महाअवास अभियान 2020-21 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्याचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी नंदुरबार जिल्ह्याने अतिदुर्गम भाग असूनही आवास अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्ह्याला गौरविण्यात आले. या गौरव सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचे वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेला सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
माळशिरस पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून प्रमोद कुमार पवार यांनी काम पाहिलेले आहे. पवार यांनी पुरस्कार स्वीकारल्याने माळशिरस तालुक्यात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!