नातेपुते एज्यूकेशन सोसायटीच्या तीन शिक्षकांना दीपस्तंभ आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार
नातेपुते (बारामती झटका)
प्रसन्न फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारा “दीपस्तंभ आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार” यावर्षी नातेपूते एज्यूकेशन सोसायटीच्या संजय पवार, अभिजित वाळके, संजय जाधव यांना प्रदान करण्यात आला. हा पूरस्कार ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहीते पाटील, प्रसन्न फाऊंडेशनचे नवनाथ धांडोरे यांच्याहस्ते देण्यात आला.
संजय पवार, अभिजित वाळके, संजय जाधव यांच्या सामाजिक, शैक्षणिाक काम, कोरोना काळात उल्लेखनीय काम, शिष्यवृत्ती परीक्षा, शैक्षणिक शालेय सहल, पर्यावरण संर्वधन, अपंग, दिव्यांग, निरक्षर, स्वच्छता अभियान सर्वेक्षण, विविध प्रशिक्षण यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमास ग्लोबल टीचर रणजीतसिंह डिसले, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहीते पाटील, प्रसन्न फाऊंडेशनचे नवनाथ धांडोरे, उपजिल्हाधिकारी अजयकुमार नष्टे, सूनिल लिंगाडे, नागेश नरळे, संजय पवार, अभिजित वाळके, संजय जाधव यांना दीपस्तंभ आदर्श शिक्षक गौरव शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपूते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख, व्हा. चेअरमन संतोष काळे, सेक्रेटरी महेश शेटे, मार्केट कमिटी उपसभापती मामासाहेब पांढरे, सभापती बाहूबली चंकेश्वरा, अरविंद पाठक, मुख्याध्यापक विठ्ठल पिसे, मुख्याध्यापक कूंडलिक इंगळे, उपप्राचार्य भारत पांढरे व संचालक मंडळ तसेच शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was a fascinating read. The points made were very compelling. Lets discuss further. Click on my nickname for more engaging content!