नातेपुते दिंडीचे आळंदीला जाण्यासाठी उत्साहात प्रस्थान – नातेपुते नगरीच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे यांच्याहस्ते पूजन संपन्न
नातेपुते (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील वै. गुरूवर्य ह. भ. प. मनोहर महाराज भगत यांची नातेपुते परिसर दिंडी सोहळा हा पायी दिंडी सोहळा नातेपुते येथून शनिवारी आळंदीकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान केले आहे. कैवल्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर नातेपुते परिसर दिंडी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने निघत असतो. यावर्षीही त्याच उत्साहाने निघत असून यानिमित्ताने शनिवारी १० जून रोजी सकाळी भजन, पुजन सोहळा नातेपुते ग्रामस्थांच्या वतीने संपन्न झाला.
वै. गुरूवर्य मनोहर महाराज भगत यांनी गेल्या २२ वर्षांपूर्वी नातेपुते गावातून दिंडीला सुरूवात केली. दिंडीमध्ये नातेपुते, सातारा, कवठेमहांकाळ, सोलापूर, पुणे, गिरवी, माळशिरस, बारामती, इचलकरंजी, जळगाव, खानदेश, आदी भागातील भाविकांचा समावेश आहे.

दिंडीच्या माध्यमातून धार्मिक, नामस्मरण, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा, सामाजिक, वृक्षारोपण, शेतीविषयी, देशभक्ती यावर कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून दिंडीच्या वतीने समाजप्रबोधन केले जाते असल्याचे ह. भ. प. भगत महाराज यांनी सांगितले. यावेळी सकाळी पुजन सोहळा नातेपुते नगरीच्या नगराध्यक्षा उत्कर्षराणी पलंगे, उमेश पलंगे, नगरसेवक रणजीत पांढरे, यांच्या हस्ते संपन्न होऊन याप्रसंगी अरविंद पांढरे, चंद्रकांत ठोंबरे, विनायकराव उराडे, अमर भिसे, डाॅ. वैभव कवितके, अमोल पाडसे, गणेश कुचेकर, संजय उराडे, जयराज पांढरे, सचिन ठोंबरे, आप्पासाहेब पांढरे, भागवतराव कोडलकर, तानाजी घोडके, शरद कोकरे, दत्तू रुपनवर, दत्तात्रय ठोंबरे, विष्णू रुपनवर, भाऊसाहेब काळे, उत्तमराव काळे, छगनराव मिसाळ, राजेंद्र एकळ, सचिन साळी, राजकुमार बिचकर, काशिनाथ बंडगर, किसन बंडगर, गोरख रुपनवर, राजेंद्र पांढरे, सुरेश बनसोडे, देविदास भुजबळ, ह. भ. प. श्रीकृष्ण महाराज भगत, ह. भ. प. गणेश महाराज भगत तसेच दिंडीतील भाविक भक्त महिला मंडळ तसेच भजनी मंडळ व पत्रकार बंधूसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पूजनाचा कार्यक्रम संपन्न होऊन आळंदीस जाण्यासाठी दिंडीचे प्रस्थान झाले. ह. भ. प. गणेश महाराज भगत तसेच दिंडीतील भाविक भक्त महिला मंडळ तसेच भजनी मंडळ व पत्रकार बंधूसह ग्रामस्थ उपस्थित होते. पूजनाचा कार्यक्रम संपन्न होऊन आळंदीस जाण्यासाठी दिंडीचे प्रस्थान झाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng