नातेपुते नगरीतील काळे शूजचा दुसरा वर्धापन दिन थाटात व दिमाखात संपन्न…
ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या काळे शूजचे यशस्वीपणे दुसऱ्या वर्षात पदार्पण…
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथील काळे शूज शोरूमचा दुसरा वर्धापन दिन थाटात व दिमाखात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. काळे शुज येथे नवनवीन व्हरायटीसह किफायतशीर किंमतीमध्ये चप्पल, सॅंडल आणि बूट उपलब्ध असल्याने ग्राहकांसाठी पर्वणीच होत आहे. तसेच मुख्य चौकात असल्याने ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे. अनेक ग्राहकांनी याचा उपभोग घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले हे काळे शूज शोरूम हे आता दुसऱ्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे.
सर्वसामान्य ग्राहकांना मनपसंत चप्पल, बूट आणि सॅंडल किफायतशीर किंमतीमध्ये उपलब्ध आहे. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सगळ्यांसाठी नवनवीन व्हरायटीसह आकर्षक असे चप्पल, सॅंडल, आणि बूट उपलब्ध आहेत. अशा या परिपूर्ण काळे शूजला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng