नातेपुते नगरीत प्रथमच गौतमी पाटील संदीप दादाच्या वाढदिवसाला नृत्यांचा अविष्कार करणार….
अतुलबापू पाटील मित्र मंडळ व संदीपदादा ठोंबरे युवा मंचाच्यावतीने बहारदार मनोरंजन असणारा गौतमी पाटील यांचा भव्य कार्यक्रम संपन्न होणार…
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते ता. माळशिरस येथील युवानेते ग्रामपंचायतचे माजी सदस्य उद्योजक संदीपदादा ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदाकरीने तरुणांच्या मनावर अधिराज्य करणारी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा बहारदार नृत्यांचा कार्यक्रम आज गुरुवार दि. 29/12/2022 रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत नातेपुते येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाशेजारी भव्य प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे. संदीपदादा यांच्या वाढदिवसानिमित्त अतुलबापू पाटील मित्र मंडळ व संदीपदादा ठोंबरे युवा मंचाच्यावतीने बहारदार मनोरंजन असणारा गौतमी पाटील यांचा भव्य कार्यक्रम प्रथमच नातेपुते नगरीमध्ये संपन्न होणार आहे.


सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्वर्गीय सुरेशदादा ठोंबरे यांचे पुतणे व नातेपुते ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चंद्रकांत ठोंबरे यांचे चिरंजीव नातेपुते ग्रामपंचायत माजी सदस्य उद्योजक युवा नेते संदीपदादा ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांच्या मनावर आपल्या अदाकरीने अधिराज्य करणाऱ्या व मनोरंजन करण्याचा कार्यक्रम सुप्रसिद्ध अभिनेत्री महाराष्ट्रामध्ये कलाविष्काराने धुमाकूळ सुरू असणाऱ्या गौतमी पाटील यांचा बहारदार कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. गौतमी पाटील यांची लोकप्रियता व युवकांच्यामध्ये असणारे आकर्षण यामुळे भव्य स्टेज, उत्कृष्ट साऊंड सिस्टिम, लाईट डेकोरेशन कोणत्याही ठिकाणी बसल्यानंतर सहज बसून कार्यक्रमाचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने नेटके नियोजन करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
