नातेपुते पोलीस स्टेशनची दंडात्मक कारवाईची रक्कम जाहीर केली मात्र, हप्ते वसुलीची गुलदस्त्यातच राहील.
नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीतील कोणतेही एक गाव अवैध व्यवसाय मुक्त आहे, असे जाहीर करण्याची महिलांची मागणी.
नातेपुते ( बारामती झटका )
सोलापूर जिल्ह्या ग्रामीणच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांची बदली झाल्यानंतर नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायामध्ये वाढ होऊन खुलेआम सुरू असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर नातेपुते पोलीस स्टेशनकडून दोन महिन्यात पाच लाखांहून अधिक दंडात्मक कारवाई केलेली असल्याचे जाहीर केलेले आहे. मात्र, अवैध व्यावसायिकांकडून हप्ते वसुलीचा आकडा मात्र गुलदस्त्यात आहे. नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीतील कोणतेही एक गाव अवैध व्यवसायमुक्त आहे, असे जाहीर करण्याची महिलांची मागणी आहे.

नातेपुते पोलीस स्टेशनकडून जुगार, अवैध दारू, अवैध वाहतुकीसह मोबाईल चोरी, मोटरसायकल चोरी अशा माध्यमातून कारवाई केलेली आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर नातेपुते पोलीस स्टेशनची हद्द येत आहे. पुणे, सातारा आणि सांगली अशा तीन जिल्ह्यांच्या सीमेलगत हद्द सुरू होते. नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अनेक भाविक दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट अशा ठिकाणी येत असतात. तर काही भाविक श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर, देहू, आळंदी व अष्टविनायक अशा दर्शनासाठी जात असतात. त्यावेळी नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीतून भाविकांना जावे लागते. अशावेळी नातेपुते पोलीस स्टेशनयांचेकडून भाविकांची लयलुट केली जाते देवदर्शनासाठी जाणाऱ्या वाहनांकडून दंड वसूल केला जातो मात्र, राजरोसपणे बेकायदेशीर वाळू वाहणारे वाहन मालक, प्रवासी वाहतूक करणारी वाहने अशा वाहनांवर कारवाई न करता भाविक भक्तांच्या वाहनांवर कारवाई केली जाते. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नाही याचा अर्थसुद्धा पोलीस स्टेशन यांनी जाहीर करावा. अवैध व्यवसायाची बातमी प्रसारित झाल्यानंतर नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते व पीडित महिला भगिनी यांच्यामध्ये समाधान व्यक्त केले जात होते.

नातेपुते पोलीस स्टेशन यांचेकडून अवैध व्यावसायिक यांची नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन केलेले आहे. त्यापेक्षा वसूलदार व बीट अंमलदार यांच्याकडून सुद्धा माहिती मिळू शकते. कारण त्यांच्याकडे आकडेवारी मिळेल. खरंच नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यवसाय बंद करायचे असतील तर त्यांनी नागरिकांना आवाहन करणे चुकीचे आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांच्याकडे अतिरिक्त पोलीस कुमक मागवून बंदोबस्त होऊ शकतो. मात्र, नातेपुते पोलीस स्टेशनची अवैध व्यवसाय बंद करण्याची मानसिकता दिसत नाही. नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीतील गावनिहाय कोणते अवैध व्यवसाय कोणत्या गावात किती आहेत, याचा लेखाजोखा लवकरच महिला भगिनी आपल्या प्रतिक्रिया देऊन नातेपुते पोलीस स्टेशनची कान उघडणे करणार असल्याचे महिला भगिनींमधून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
