नातेपुते येथील अनिश पलंगे यांची स्थापत्य अभियांत्रिक पदी निवड
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते येथील अनिश राजेंद्र पलंगे यांची महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, येथे स्थापत्य अभियांत्रिकी अधिकारी ‘गट ब’ पदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्षय शिक्षण संस्थेमध्ये झाले. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नातेपुते एज्युकेशन सोसायटी येथे झाले. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये कळंब येथे डिप्लोमा तर पाणीव येथे त्यांनी B.E. (civil) पदवी घेतली.
त्यांची आई गायत्री राजेंद्र पलंगे आशा स्वयंसेविका आहेत. त्यांनी अनिश यांना खंबीर साथ दिली तर वडील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ येथून निवृत्त कर्मचारी आहेत. अनिश यांनी जिद्दीने व सातत्यपूर्ण परीश्रम घेऊन त्यांनी २०२० रोजीच्या घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सरळ सेवा परीक्षेत खुल्या वर्गातून १५९ व्या क्रमांकाने त्यांची निवड झालेली आहे. या त्यांच्या भरगोस यशामुळे आईवडिलांचे व पलंगे कुटुंबियांचे नाव उज्वल केलेले आहे. या यशाबद्दल नातेपुते येथील मित्रपरिवारांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng