नातेपुते येथे लक्ष्मी कृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आ. राम सातपुते आणि माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथील लक्ष्मी कृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा आमदार राम सातपुते व विधान परिषदेचे माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांच्या शुभहस्ते आज मंगळवार दि. २९/०८/२०२३ रोजी सायं. ५.३० वा. अण्णाभाऊ साठे चौक, दहिगाव रोड, नातेपुते येथे संपन्न होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी बाळूमामा फेम सुमित पुसावळे आणि सिने लेखक तेजपाल वाघ यांचे खास आकर्षण असणार आहे.
या उद्घाटन समारंभ प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, नातेपुतेचे माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्र पाटील, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन रघुनाथ कवितके, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. अनिता लांडगे, नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक राजेंद्रदादा उराडे, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. एम. पी. मोरे, धुळदेव पतसंस्थेचे चेअरमन ॲड. डी. एन. काळे, व्यापारी संघटना नातेपुतेचे अध्यक्ष बाहुबली चंकेश्वरा, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब भांड, सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन ॲड. रणवीर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संदीपदादा ठोंबरे, नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या उद्घाटन समारंभाला ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब नाना काळे यांचे विशेष सहकार्य असणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मी कृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नातेपुतेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, सेक्रेटरी व सेवक वर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! Your breakdown of the topic is commendable. For further reading, here’s a useful resource: READ MORE. Let’s discuss!