नातेपुते येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

लक्ष्मण मगर पाटील, भाजपा नातेपुते व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते, ता. माळशिरस येथे आषाढी वारी निमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२५ दरम्यान ना. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे संकल्पनेतून व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. लक्ष्मण राजाराम मगर पाटील भाजपा, नातेपुते शहर व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन कोपरगाव, जि. अहिल्यानगर यांच्यावतीने आरोग्यवर्धिनी २०२५ या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार दि. ३०/६/२०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ जब्बार फर्निचर जवळ, पुणे-पंढरपूर रोड, नातेपुते, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.


सदर शिबिरास्थळी जब्बार मुलाणी यांचेही विशेष सहकार्य लाभणार आहे. पुणे-पंढरपूर रोड शिंगणापूर पाटी ते नातेपुते रोडवरील जब्बार फर्निचर समोर मोफत आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे.
तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मण राजाराम मगर पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.



नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.