नातेपुते येथे श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
नातेपुते ( बारामती झटका )
विघ्नविनाशक गणरायाचे बुधवार दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी पावसात सरीत, ढोल ताशांच्या गजरात उत्साहात आगमन झालेले आहे. सार्वजनिक गणपती मंडळाच्या लहान, तरुण आणि वडीलधाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह खरंच पाहण्यासारखा होता. उत्साही वातावरणामध्ये सर्वच ठिकाणी गणरायांच्या प्रतिष्ठापना झालेल्या आहेत.


माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते यांनी रक्तदान हेच श्रेष्ठदान असे समजून गणपती उत्सवातील सामाजिक कार्याला रक्तदान शिबिराने सुरुवात केलेली आहे. गुरुवार दि. 01 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 09.30 वाजता नातेपुते येथील संदीप किराणा स्टोअर्स शेजारी भव्य रक्तदान शिबिराचे विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे.

तरी रक्तदानाच्या या पवित्र कार्यात सहभागी होऊन मानवतेचे नाते अखंड जपत सर्व रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते यांच्यावतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
