नावातच.. संस्कृती असणाऱ्या सुसंस्कृत व हिंदू संस्कृती जपणाऱ्या समाजसेविका आदर्श महिला व्यक्तिमत्व यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव…
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ. संस्कृती रामभाऊ सातपुते उर्फ ताईसाहेब यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नावातच संस्कृती असणाऱ्या सुसंस्कृत आदर्श गृहिणी व हिंदू संस्कृती जपणाऱ्या समाजसेविका आदर्श महिला व्यक्तिमत्व असणाऱ्या संस्कृतीताई यांनी समाजकार्यातून व आपल्या सुसंस्कृत आचरणातून समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.
शालेय विद्यार्थी जीवनामध्ये राम आणि संस्कृती यांचा योगायोगाने परिचय होऊन अधिक दृढ संबंध होऊन वैवाहिक जीवनापर्यंत नाते गेलेले आहे. माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत राम सातपुते यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस आणि विजयाचे पडद्यामागील किंगमेकर आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्यामुळे भाजपची उमेदवारी मिळालेली होती. त्यावेळेला संस्कृती व राम यांचा विवाह झालेला नव्हता. मात्र, साखरपुडा झाला होता. त्यामुळे संस्कृतीताई माळशिरस तालुक्यात प्रचारानिमित्त जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. ज्योतीताई पाटील यांच्या समवेत प्रचार करीत फिरत होत्या. सुरुवातीस कार्यकर्त्याची मैत्रीण, नंतर आमदाराची पत्नी झाल्या, तरी सुद्धा त्यांनी आपल्या वागण्या बोलण्यातील संस्कृती सोडलेली नाही. समाजामध्ये आपण पाहतो राजकीय हवा डोक्यात शिरल्यानंतर अनेकांचे विचार व आचरण बदलले जाते. मात्र, संस्कृतीताई अपवाद ठरलेल्या आहेत.
माळशिरस तालुक्यामध्ये वावरत असताना आमदाराची पत्नी, अशी हवा त्यांनी कधीच डोक्यामध्ये ठेवलेली नाही. समाजामध्ये सर्व जाती धर्मातील महिला, लहान मुले यांच्यामध्ये त्या रमून जात असतात. महिलांसाठी विशेष कार्य करून महिला अबला नसून सबला आहे, हा संदेश देण्याकरता त्यांनी महिलांचा मोठ्या प्रमाणात भेटीगाठीचा सोहळा आयोजित केलेला होता. यामध्ये तालुक्यामधील राजकारणी घराण्यासह मोल मजुरी करणाऱ्या महिलांनी सहभाग नोंदवलेला होता. अनेक महिलांनी एकमेकांशी हितगुज साधले. तालुक्यामध्ये वेगळा आदर्शवत संदेश तयार केलेला होता. आमदार राम सातपुते यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने बाहेरच्या राज्यात गेलेले असताना मतदार संघातील अनेक छोट्या मोठ्या घरगुती कार्यक्रमांना संस्कृतीताई उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. त्यांचा स्वभाव, वागण्यातील सुसंस्कृतपणा यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या महिलांमध्ये आपलेपणा निर्माण झालेला आहे. आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी जरी असल्या तरी त्यांनी स्वतःची समाजसेवेतून व आचरणातून वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. माळशिरस तालुक्यात त्यांचे अनेक कुटुंबातील महिला व मुलींसोबत एकरूपतेचे नाते निर्माण झालेले आहे.
संस्कृतीताई यांच्यावर वाढदिवसानिमित्त मतदार संघातील अनेक कार्यकर्ते, महिला, माता, भगिनी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बारामती झटका परिवार यांचेकडून सौ. संस्कृती राम सातपुते उर्फ संस्कृतीताई यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ताईसाहेब आपणास उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस साकडे. हितचिंतक श्रीनिवास कदम पाटील परिवार, मळोली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng