निलिमा चव्हाण हत्येच्या तपासाबाबत राष्ट्रीय नाभिक संघटनेचे निवेदन
अकलूज (बारामती झटका)
कु. निलिमा सुधाकर चव्हाण, रा. ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी ही स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा दापोली येथे कार्यरत होती. दापोलीवरून घरी जाताना ती बेपत्ता झाली. दि. 01/08/2023 रोजी दाभोळ खाडीत तिचा मृतदेह मिळाला. यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने तपास केला. परंतु, सदर तपासामध्ये पोलीस खात्याने नीलिमा चव्हाण यांनी आत्महत्या केली असावी, असा दावा केल्याचे निदर्शनास येते. परंतु, स्थानिक पोलीस प्रशासन तपास करण्यास अपयशी ठरल्याने निलिमा चव्हाण हत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवरून अथवा सीआयडी कडे द्यावा. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, या मागणीसाठी आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन माळशिरस तालुका राष्ट्रीय नाभिक संघटनेतर्फे डीवायएसपी सई भोरे पाटील मॅडम व प्रांताधिकारी अकलूज यांना देण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते यशवंत अण्णा साळुंखे, जिल्हाध्यक्ष किरण भांगे, तालुकाध्यक्ष राहुल सराटे, जिल्हा सरचिटणीस सचिन डांगे, संपर्कप्रमुख योगेश जाधव, तालुका सचिव रोहित काळे, उपतालूकाध्यक्ष धनेश डांगे, विभागप्रमुख अजिनाथ वाघमारे, शहराध्यक्ष अक्षय शिंदे, सचिन सराटे, अभिषेक भोसले, दोस्ती ग्रुप संस्थापक अण्णासाहेब सुरवसे, संजय गोरे, बापू सुरवसे, संतोष काशिद आदींसह रिपाईचे तालुकाध्यक्ष मिलिंद नाना सरतापे उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng