पंचाहत्तर वर्षीय पणजी श्रीमती जगूबाई जानकर यांनी ग्रामपंचायत मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला..
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महिलांचाही उदंड प्रतिसाद..
माळशिरस (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी व विरोधक एकमेकांना आमने सामने होते. अशा चुरशीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात तरंगफळ येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीमती जगुबाई जानकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी पणजी झाल्यानंतरही मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
श्रीमती जगूबाई जानकर यांचे वय जरी 75 असले तरीसुद्धा त्या शेतातील कामे करून सामाजिक कार्यात व राजकारणात सक्रिय असतात. आजीबाईची गोफण म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात आहे. त्यांनी जागतिक महिला दिनाला ट्रॅक्टर चालवून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला होता. नातींचे परीक्षेमध्ये यश संपादन केल्यानंतर कोडकौतुक सुद्धा आजीबाई करीत असतात.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख जानकर यांच्या अपंग दिन व सामाजिक कार्यात नेहमी श्रीमती जगुबाई जानकर यांचा सहभाग असतो. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वात वयोवृद्ध ग्रामपंचायत मतदार संघात त्यांनी मतदान स्वतः करून वय वाढून सुद्धा सुदृढ असल्याचे समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
¿Cómo recuperar mensajes de texto móviles eliminados? No hay una papelera de reciclaje para mensajes de texto, entonces, ¿cómo restaurar los mensajes de texto después de eliminarlos? https://www.mycellspy.com/es/tutorials/how-to-retrieve-deleted-text-messages-from-partner-phone/
I’ve done a lot of online casino information, we’ve helped a lot with the casino, and we’ve never scammed anyone. All I can say is your post is beautiful, thanks for sharing.