शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती स्वराज्य प्रतिष्ठान अकलूज यांच्यावतीने साजरी होणार….

मा. आ. राम सातपुते, जिल्हा परिषद सदस्य संस्कृतीताई सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती महोत्सव समारंभाचे आयोजन…
अकलूज (बारामती झटका)
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. 19/22026 रोजी करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये धर्मवीर संभाजीराजे चौक, शिवसृष्टी कॉर्नर, अकलूज, ता. माळशिरस येथे करण्यात आलेले आहे.
सकाळी दहा ते दोन रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आहे. सकाळी 11 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाप्रसाद व सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भव्य मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सदरच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते, दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या संस्कृतीताई रामभाऊ सातपुते, अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे, हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकलूज शहराध्यक्ष अनिल रामलाल बनपट्टे, युवा नेते डॉ. अक्षय तानाजी वायकर, भाजपचे अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे यांची उपस्थिती राहणार आहे.

सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. तरी शिवप्रेमींनी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



