पंढरपूर येथे हटकर समाजाच्या मेळाव्याचे आयोजन – ह.भ.प. आण्णा महाराज भुसनर
पंढरपूर (बारामती झटका)
रविवारी दि. 11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा. किसनगिरी महाराज देवगड मठ, स्वराज्य ट्रॅक्टर शोरूम शेजारी, विठ्ठल कारखाना रोड, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्याचे उद्घाटन श्री. सचिन कवले समाज कल्याण आयुक्त सोलापुर, श्री. श्रीकांत निळे तहसीलदार ता. बिलोली, नांदेड, श्री. सुखदेव गोदे पोलिस अधिकारी पंढरपूर यांच्याहस्ते होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवा उद्योगपती अभिजीत पाटील साहेब चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर, श्री. कल्याण काळे चेअरमन संत शिरोमणी भाळवणी, दिलीप बापु धोत्रे मनसे नेते महाराष्ट्र, युवा नेते प्रणव परिचारक साहेब, श्री. बी. पी. रोंगे सर व्हा.चेअरमन विठ्ठल पंढरपूर
तसेच राष्ट्रीय जनमंच पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यावेळी समाजातील जेष्ठ नेते मंडळी, युवा नेतृत्व, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, डाॅक्टर, युवा उद्योजक, उद्योगपती, पत्रकार/ संपादक, कारखाना प्रशासकीय अधिकारी, सांप्रदायिक, ड्रायव्हर ग्रुप, देवस्थान पुजारी, सरपंच, प्रगतशील बागायतदार, हटकर समाज महासंघाचे पदाधिकारी, विविध खेळात प्राविण्य मिळवलेले खेळाडू, प्रशिक्षक, प्रदेश कोअर कमिटी, यांना हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांच्या वतीने “सन्मानचिन्ह” देण्यात येणार आहे. सदरचा सन्मान प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे हस्ते दिला जाईल.
पंढरपूर येथील मेळाव्यास कर्नाटक, विदर्भ, मराठवाडा, मुंबई, खाणदेश, पुणे येथून समाज बांधवांसह कुटुंब परिवार उपस्थित राहणार आहेत. सदर मेळाव्याचे नियोजन पंढरपूर परिसरातील समाज बांधवांनी केले आहे. तरी या भव्य दिव्य मेळाव्यास उपस्थित राहुन शोभा वाढवावी, असे आवाहन हटकर समाज महासंघाचे कोअर कमिटीचे संचालक ह. भ. प. आण्णा महाराज व युवा नेते गणेश भुसनर यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng