‘पंढरीची वारी आरोग्य आपल्या दारी’ माहितीपत्रकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रकाशन
पंढरपूर (बारामती झटका)
‘पंढरीची वारी आरोग्य आपल्या दारी’ या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत पंढरपूरला येणाऱ्या दहा लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून सर्वांना मोफत औषधे व चष्मे दिले जाणार आहेत, याचा लाभ सर्व वारकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज सोमवार दि. २६/०६/२०२३ रोजी अनिल सावंत यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या माहितीपत्रक व स्वयंसेविकांना वाटल्या जाणाऱ्या टी-शर्ट चे प्रकाशन केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, तालुकाप्रमुख शिवाजीराव बाबर, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत उपस्थित होते.
आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून दोन लाख अधिपत्रकाचे वाटप करण्यात आले आहे. 5000 स्वयंसेवकांना टी-शर्ट आणि निवासाची सोय केली आहे
सदर शिबिरात ५-१० हजार डॉक्टर तपासणीसाठी येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य शिबिरासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ५०० स्वयंसेवक येणार असून धाराशिव जिल्ह्यातून ५००० स्वयंसेवक येणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng