ताज्या बातम्या

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील माळशिरस तालुक्यातील श्रीपुर-खंडाळी रस्त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न होणार…

माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. बबनदादा शिंदे, आ. राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार.

महाळुंग (बारामती झटका)

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्यातील श्रीपुर ते खंडाळी या रस्त्याचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. २९/०७/२०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

श्रीपुर ते खंडाळी या रस्त्याचे काम मे एस. सी. शेंडगे कन्स्ट्रक्शन कंपनी वाघोली यांनी केलेले आहे. सदरच्या रस्त्याची लांबी ७.१०० किलोमीटर आहे. सदरच्या रस्त्याची मंजूर रक्कम ५२०.३९ लक्ष एवढी आहे. सदरचा रस्ता पूर्ण झालेला असून रस्त्याचा लोकार्पण सोहळा लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

गेली अनेक दिवस सदरचा रस्ता नादुरुस्त असल्याने वाहनधारक व स्थानिक नागरिक यांना अडचण होत होती. तीच अडचण माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून रस्त्याचा प्रश्न निकाली निघालेला असून प्रत्यक्ष रस्ता तयार झालेला आहे. लोकार्पण सोहळा होत असल्याने श्रीपुर-खंडाळी परिसरासह आसपासच्या गावातील लोकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button