१४ गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – रणजीत शिंदे
वाघोली (बारामती झटका)
माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील १४ गावांतील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी व विकासासाठी शिंदे परिवार कधीही कमी पडणार नाही, असे आश्वासन माढा पंचायत समितीचे माजी सभापती सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे यांनी १४ गावांच्या भेट दौऱ्यानिमित्त वाघोली येथे दिले.
मौजे वाघोली, ता. माळशिरस या गावात भेटी दरम्यान युवा कार्यकर्ते दत्तात्रय प्रभाकर मिसाळ, संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी गावातील २५/४ ते वाघोली रस्ता, वाघोली ते बाभुळगाव रस्ता, गावातील सिंगल फेज नवीन डीपी बसवणे, समाजमंदिरे इत्यादी कामे आमदार बबनदादा शिंदे यांनी मंजूर करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवाव्यात, अशा प्रकारच्या मागण्या केल्या असता आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कामे मंजूर करू. तसेच वाघोलीसह तालुक्यातील माढा विधानसभा मतदार संघातील १४ गावांना विकासनिधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन रणजितसिंह शिंदे यांनी देऊन सध्या सोलापूर दूध उत्पादक संघाचे दूध संकलन मोठ्या प्रमाणात वाढत असून आपल्या गावात या संघाची दूध संकलन संस्था कोणाला पाहिजे असेल तर तीही देऊ, आपण फक्त मागणी अर्ज करा असे सांगितले.
यावेळी पोपट (मामा) चव्हाण, चव्हाणवाडी टेंभूर्णीचे नेते हनुमंत चव्हाण, केन मॅनेजर संभाजी थिटेसाहेब, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे शेतकी अधिकारी प्रदीप राजमाने साहेब, साखर कारखान्याचे शेळके साहेब, वाघोली गावातील माजी चेअरमन दिलीप मिसाळ, बळीराम मिसाळ, दत्तात्रय मिसाळ, अशोक चव्हाण, सूर्यकांत मिसाळ, माजी उपसरपंच हनुमंत मिसाळ, विलास मिसाळ तसेच वाघोली गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी केले तर आभार दत्तात्रय मिसाळ यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng