‘पांडुरंग’ कारखान्याचा उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा
ऊस दरात ‘पांडुरंग’ ची आघाडी
श्रीपुर (बारामती झटका)
सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासणारा कारखाना म्हणून ख्याती असलेला पांडुरंग कारखाना आता उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे नावारूपास आला आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक ११.५० टक्के साखर उतारा मिळवत ऊस उत्पादकांना २७०० रु. उच्चांकी दर दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उच्चांकी दर व साखर उताऱ्यात अव्वल स्थानी असल्याने ‘पांडुरंग दरात व उताऱ्यात लयभारी’, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे गेली सहा-सात वर्षांमध्ये कारखान्याचा साखर उतारा ११% च्या पुढे ठेवला आहे.
शेतकरी हीच जोपासण्यात नेहमीच अग्रेसर
यंदाच्या हंगामात ९ लाख ६१ हजार मे. टन उसाचे गाळप करून जिल्ह्यात सर्वाधिक ११.५० टक्के साखर मिळवत ९ लाख ५५ हजार ५९० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन काढले आहे. सभासद शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था असलेला हा कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून कारखाना शेतकरी हित जोपासण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
२७०० रुपये ऊस उत्पादकांना उच्चांकी दर
गत व चालू हंगामामध्ये साखर उतारा सर्वाधिक आहे. त्यामुळे पुढील वर्षी सुद्धा पांडुरंगाची एफआरपी सर्वात जास्त असणार आहे. गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये हा कारखाना प्रतिदिन ९ हजार मे. टन गाळप क्षमतेने चालणार असून त्या दृष्टीने कारखान्यामधील आवश्यक त्या सर्व सुधारणा करण्यात येत आहेत. – डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक
लौकिकास साजेशी कामगिरी
कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी नेहमीच साखरेच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून साखर, उपपदार्थांबाबत देशांतर्गत धोरण लक्षात घेऊन पांडुरंग कारखान्याची प्रगती साधली आहे. त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे कारखान्याने देशात सर्वोत्कृष्ट कारखान्यासह अन्य अनेक पुरस्कार पटकावले आहेत. हा कारखाना नावानुसार त्यांच्या लौकिकास साजेशी कामगिरी करत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng