पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कृष्णा खोरे प्लड डायव्हर्शन योजनेची मान्यता घेतल्याबद्दल सन्मान सोहळा संपन्न.
माळशिरस तालुक्यात कृष्णा खोरे प्लड डायव्हर्शन योजनेची मान्यता घेतल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फलटण ( बारामती झटका )
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडून रेंगाळलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे कृष्णा खोरे प्लड डायव्हर्शन असे नामकरण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व अजित दादा पवार यांच्या सरकारने कृष्णा खोरे ब्लड डायव्हर्शन योजनेस तत्वतः मान्यता दिलेली असल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील माढा विधानसभा मतदार संघामध्ये माळशिरस तालुक्यातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोकराव चव्हाण नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील नगरसेवक विक्रम सिंह लाटे पाटील महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्तव्यदक्ष चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाडेकर प्रगतशील बागायतदार सचिन बापू राणे यांनी फलटण येथील निवासस्थानी सन्मान करण्यात आला.
पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा भागामध्ये कृष्णा नदीतून जे पाणी वाहत जाते त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते त्यामुळे जनजीवन व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते यासाठी वाहून जाणारे अतिरिक्त पाणी जर दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून दिले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचन होईल व सातारा जिल्ह्यातील मान खटाव पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर मराठवाडा या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होऊन या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपेल यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या निदर्शनास बाब आणून दिल्यानंतर तातडीने माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व लोक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देऊन हा प्रकल्प अंदाजे वीस हजार कोटी रुपयाचा असून त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली असल्याने मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला भविष्यात कायमस्वरूपी शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार असून संपूर्ण भाग ओलीचा खाली येणार असल्याने महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची महत्त्वकांक्षी प्रकल्प कृष्णा खोरे प्लड डायवर्षण प्रोजेक्ट मंजूर करण्यासाठी कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेला असल्याने अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून महाळुंगश्रीपुर चे नगराध्यक्ष अशोकराव चव्हाण नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील नगरसेवक विक्रम सिंह लाटे पाटील महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्तव्यदक्ष चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाडेकर बागायतदार सचिन बापू राणे यांनी पाणीदार खासदार यांचा सन्मान करून महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चा करण्यात आली पुरातन यमाई देवी मंदिराच्या विकासासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून सविस्तर चर्चा करण्यात आली भविष्यात यमाई देवीच्या मंदिराच्या कामास कोणत्याही प्रकारचा निधीची कमतरता भासणार नाही याची ग्वाही खासदार नाईक निंबाळकर यांनी दिली त्याबद्दलही श्रीपुर महाळुंग ग्रामस्थांच्या वतीने व समस्त शेतकरी बांधव यांच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I found this article both informative and enjoyable. It sparked a lot of ideas. Lets talk more about it. Click on my nickname!