पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नागरी सत्काराचे निमंत्रण आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांना देण्यासाठी शिवरत्नवर शिष्टमंडळ दाखल.
कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून रखडलेल्या नीरा-देवधर प्रकल्पास सुधारीत मान्यता मिळवून घेतली आहे.
माळशिरस ( बारामती झटका)
नीरा-देवधर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल पाणीदार खा. रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता गजानन चौक फलटण येथे आयोजित केला आहे. सदरच्या नागरी सत्काराचे निमंत्रण अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे येऊन विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आ. राम सातपुते यांना निमंत्रण देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अशोकराव जाधव, भाजपचे फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते, बाळासाहेब कदम, बजरंग गावडे, अल्पसंख्यांक सेलचे ना. देवेंद्रजी, तालुका अध्यक्ष रियाज इनामदार या शिष्टमंडळाने सत्काराचे निमंत्रण दिले.
गेली अनेक वर्षे नीरा-देवधर प्रकल्प रखडला होता. त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी निधी मंजूर करीत सुधारित शासकीय मान्यता दिली. त्यासाठी माढा लोकसभेचे कार्यतत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व सर्व शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळवून दिल्याने त्यांचा भव्य असा नागरी सत्कार आयोजित केला असून या सत्काराला छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. ४/२/२०२३ रोजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यात खंडाळा येथे सत्कार करण्यात येणार आहे, त्यानंतर खंडाळा, लोणंद येथे भाजपा व शेतकरी त्यांचे स्वागत करतील, त्यानंतर सायंकाळी जिंती नाका फलटण येथे व तेथून त्यांची भव्य व दिव्य मिरवणूक निघेल. व ते मलठणमधून गजानन चौक येथे उपस्थित राहतील व त्या ठिकाणी त्यांचा भव्य असा सर्वांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng