पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम जाहीर.
श्री विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर, सिद्धेश्वर सोलापूर, तुळजाभवानी तुळजापूर, श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट, श्री दत्तात्रय महाराज गाणगापूर आदी देवदर्शनासह छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार हुतात्मा पुतळा अभिवादन आणि जिल्हा नियोजन बैठकीसह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर, सिद्धेश्वर सोलापूर, तुळजाभवानी तुळजापूर, श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट, श्री दत्तात्रय महाराज गणगापूर आदी देवदर्शनासह छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार हुतात्मा पुतळा यांना अभिवादन करून जिल्हा नियोजन बैठकीसह अनेक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे खाजगी सचिव विकास पाटील यांनी जाहीर केलेला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील सोमवार दि. 03/10/2022 रोजी सोयीनुसार पंढरपूर येथे आगमन व मुक्काम करणार आहेत. मंगळवार दि. 04/10/2022 रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथून श्री विठ्ठल मंदिर पंढरपूरकडे प्रयाण करतील. 9.00 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे दर्शन घेवून मोटारीने सोलापूरकडे रवाना होणार आहेत. सोलापूर येथे 10.30 वाजता आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जुना पुना नाका व पांजरपोळ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.

पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळा यांचे अभिवादन करून महानगरपालिका इमारती समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून 11 वाजता सिद्धेश्वर मंदिर दर्शन घेणार आहेत. 11.30 वाजता नियोजन भवन सात रस्ता येथे जनावरांना झालेल्या बाबत आढावा व पशुसंवर्धन आयुक्त व लंम्पी आजाराच्या अनुषंगाने गठीत केलेल्या टास्क फोर्स सोबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर 12 वाजता मुख्यमंत्री सडक योजना आढावा बैठक 12.30 वाजता पंढरपूर विकास आढावा बैठक होणार आहे.
12.45 वाजता हेरिटेज हॉटेल येथे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचे समवेत चर्चा राखीव व स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 02 वाजता नियोजन भवन सात रस्ता येते जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक असून त्यानंतर 03 वाजून 45 मिनिटांनी पत्रकार परिषद होणार आहे. सायंकाळी 04 वाजता सोलापूर येथून मोटारीने तुळजापूरकडे रवाना होणार असून 4:45 वाजता तुळजापूर मंदिर येथे दर्शन घेणार आहेत. 05.30 वाजता तुळजापूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करणार आहेत.

शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव 06.30 वाजता सिद्धेश्वर तलाव सोलापूर येथील लाईट अँड साऊंड शो लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 6:45 वाजता सोलापूर येथून अक्कलकोटकडे प्रयाण करणार आहेत. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरामध्ये दर्शन घेवून रात्री 08 वाजता अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव राहणार आहेत. रात्री 08.30 वाजता अक्कलकोट येथून गाणगापूरकडे प्रयाण होऊन रात्री 10 वाजता गाणगापूर जि. गुलबर्गा, कर्नाटक येथे दर्शन व मुक्काम होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng