पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते महिला बचत गट मेळावा व कर्ज वाटपाचे आयोजन
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार संपन्न
सदाशिवनगर (बारामती झटका)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व महिला दिनाचे औचित्य साधून महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर, शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट आणि डॉटर्स मॉम्स फाउंडेशन यांच्यावतीने महिला बचत गट मेळावा व कर्ज वाटपाचे आयोजन रविवार दि. १९/३/२०२३ रोजी दुपारी ३.१५ वा. श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रम श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर यांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे.
तसेच यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यशवंतनगरचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, विधानसभेचे आमदार राम सातपुते, सौ. संस्कृती राम सातपुते, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जागीरदार, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. सुभाषअण्णा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या व भाजपा नेत्या सौ. संजीवनी ताई पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणपतराव वाघमोडे, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे, माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, महाळुंगच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी चव्हाण, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यशवंतनगरचे व्हाईस चेअरमन ॲड. प्रकाश आप्पा पाटील, शिवामृत दूध संघाचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिलारे, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगरचे व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, नातेपुतेचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, महाळुंगचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब पराडे पाटील, आरपीआयचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती संजय काळे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब होले, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव भानवसे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष आबा कुचेकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतापराव पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाषराव निंबाळकर, जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड सोलापूरचे नितीन शेळके, माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. शोभाताई साठे, सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा समन्वय अधिकारी मावीम सोलापूरचे सोमनाथ लामगुंडे, विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी माविम मराठवाड्याचे सिद्धाराम माशाळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद सोलापूरचे सचिन चवरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सोलापूरचे प्रशांत नाशिककर, प्र. उपविभागीय अधिकारी मा.वि. अकलूजच्या सौ. ज्योती कदम, अकलूज पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, माळशिरसचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवरत्न वेल्फेअर ट्रस्टच्या अध्यक्षा वैष्णवीदेवी मोहिते पाटील, डॉटर्स फाउंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील आणि माविमचे माळशिरस तालुका व्यवस्थापक रणजीत शेंडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great article! I loved the humor you infused into the topic. For a deeper dive, check out this link: EXPLORE NOW. What do you think?
Hola, quería saber tu precio..