पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला बचत गट मेळावा व महिला दिनाच्या कार्यक्रमात महिला सरपंचांचा अवमान – युवा नेते सोमनाथ पिसे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महिला दिनाचे औचित्य साधून महिला बचत गट मेळावा व कर्ज वाटपात पुरंदावडे गावच्या महिला सरपंच यांना जाणीवपूर्वक डावलले…
थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच मोहिते असताना सुद्धा मोहिते पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे पुरंदावडे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.
पुरंदावडे ( बारामती झटका )
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महिला दिनाचे औचित्य साधून महिला बचत गट मेळावा व कर्ज वाटप कार्यक्रमात पुरंदावडे गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच मोहिते यांना जाणीवपूर्वक डावलले असून निमंत्रण पत्रिकेत साधे नाव सुद्धा टाकले नाही. इतर मानसन्मान तर लांबच राहिला. गावच्या महिला सरपंचाचा अवमान केलेला आहे. थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच मोहिते असतानासुद्धा कार्यक्रमाचे आयोजक मोहिते पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे पुरंदावडे ग्रामस्थ यांच्यामधून नाराजीचा सूर येत असून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते पुरंदावडे गावचे युवा नेते सोमनाथ पिसे यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त व महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि. १९/०३/२०२३ रोजी दुपारी अनेकांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर संपन्न झाला. त्यामध्ये गावच्या महिला सरपंच यांचा जाणीवपूर्वक अवमान केलेला आहे. त्याचा जाहीर निषेध युवा नेते सोमनाथ पिसे यांनी करून स्वागतासाठी पुरंदावडे ग्रामपंचायत कमान उभा करण्याच्या सूचना देतात. मात्र, सरपंचांच्या पदाचा मानसन्मान न राखता अवमान करता, ही गोष्ट लाजिरवाणी आहे.
पालकमंत्री यांचे हेलिकॉप्टर पुरंदावडे गावच्या हद्दीमध्ये उतरणार होते. त्यावेळेस तरी गावच्या थेट लोकनियुक्त जनतेतील सरपंच यांना मान देणे गरजेचे होते. पुरंदावडे सदाशिवनगर ही दोन्ही गावे एकच असल्यासारखी आहेत. सदाशिवनगरच्या सरपंचांना सुद्धा डावले आहे. मात्र, त्यांच्याशी आमचे काही देणे घेणे नाही. खऱ्या अर्थाने मोहिते पाटील यांच्या विचाराची ग्रामपंचायत फक्त म्हणायची, अशी दुर्दैवी वेळ जनतेवर आलेली आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये पुरंदावडेकर आपला स्वाभिमान दाखवून देतील, असा सूचक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सोमनाथ पिसे यांनी आपल्या प्रखर प्रतिक्रिया देताना सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great job on this piece! It was very informative and engaging. I’m eager to hear different perspectives on this. Click on my nickname for more engaging content.