ताज्या बातम्या

नगरसेवक प्रकाश नवगीरे यांच्यावतीने स्थानिक पत्रकार यांचा सन्मान सोहळा

श्रीपूर (बारामती झटका)

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे नगरसेवक व अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतील मुख्याध्यापक प्रकाश नवगीरे सर यांनी श्रीपूर मधील स्थानिक पत्रकार यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी पत्रकारांशी औपचारिक गप्पा व संवाद साधताना नवगीरे सर यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकीची जाणीव व समाजातील वास्तव घटना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मांडणारे पत्रकार यांचा सन्मान करुन त्यांचा आदर करावा, हा उद्देश आहे. ते पुढे म्हणाले, मी सुध्दा पत्रकारितेचा शासकीय कोर्स पूर्ण केला आहे. मी पत्रकारिता पास आहे. ३० एप्रिल रोजी मी शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर मी ही पत्रकारिता सुरू करणार आहे. समाजकारण, राजकारण यांचा संबध असणारच आहे. नगरसेवक म्हणून मी माझ्या वार्डातील समस्या, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

ते पुढे असेही म्हणाले की, अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत ३१ वर्षे ६ महिने एवढी प्रदिर्घ सेवा केली आहे. ३० एप्रिल रोजी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहे. या सेवा कार्यकाळात अनेक चांगले अनुभव आले. समाजात शिक्षणापासून वंचीत असलेल्या गरजू होतकरू व हुशार विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचेकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्यांना सर्वोतोपरी सहकार्य मदत देण्याची जबाबदारी पार पाडली. त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शिक्षकाने शालेय जीवनात दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी सर्व शिक्षक सहकारी यांना समवेत घेऊन विद्यार्थ्यांना मदत केली आहे. सर्व शिक्षक, पालक व समाजातील घटकांशी संवाद साधला आहे. त्यामुळे मनाला आत्मिक समाधान आहे. वाचन, अभ्यास संवाद भेटीगाठी यामुळे आता राहिलेले कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले, राजकारणात अनावधानाने आलो आहे. महाळुंग श्रीपूर नगरपंचायत निवडणुक लागली होती. मनात सहज विचार आला, आपण आपल्या वार्डात नगरसेवक का होऊ नये. तेव्हा मनात जिद्द होती. चर्चा झाली, उमेदवारी मागितली, ती लगेच मिळाली व निवडून आलो. स्थानिक पातळीवर माझ्यावर महाळुंग श्रीपूरचे लोकप्रिय नेते कुंडलीक रेडे पाटील यांचा प्रभाव आहे‌. ते माझे राजकीय मार्गदर्शक गुरु असल्याचे मी त्यांना मानतो. आज संध्याकाळी त्यांचे निवासस्थानी पत्रकार सन्मान सोहळा व औपचारिक गप्पा संवाद या कार्यक्रमास महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीचे आरोग्य सभापती सोमनाथ मुंडफणे, नगरपंचायतचे बांधकाम सभापती तानाजी भगत, पप्पूशेठ महाळुंग सोसायटी चेअरमन राजेंद्र वाळेकर, अनिल सावंत, अमर पिसाळ देशमुख, विक्रम लाटे, जिवन मोहिते, विकास गोडसे, संतोष पोखरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, रमेश देवकर, नानासाहेब चांगदेव मुंडफणे, शेखर जाधव तसेच प्रकाश नवगीरे सर यांचे सहकारी मित्र, नातेवाईक आवर्जून उपस्थित होते.

पत्रकार सन्मान सोहळ्यास पत्रकार महादेव जाधव यांनी प्रकाश नवगीरे सर यांचे विषयी बोलताना सांगितले की, नवगीरे सरांनी अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत ३१ वर्षे सेवा करताना हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले आहे. प्रामाणिकपणा व जबाबदारीचे भान ठेवून त्यांनी गरजू होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य करुन त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यकाळात त्यांना सुख, निरोगी आयुष्य लाभो, या सदिच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश केसकर, बी. टी. शिवशरण, महादेव जाधव, सुखदेव साठे, दत्तात्रय नाईकनवरे आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort