पिसेवाडीतील घर जळून संसार उघड्यावर आलेल्या पद्मिनी गाजाळे यांना उमेशशेठ भाकरे यांच्याकडून आर्थिक मदत.
ना मतासाठी, ना स्वार्थासाठी फक्त जनतेच्या जनहितासाठी, सामाजिक कार्याचा वसा, जनतेसाठी सदैव तत्पर
पिसेवाडी ( बारामती झटका )
पिसेवाडी ता. माळशिरस येथील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील पद्मिनी तायप्पा गाजाळे यांचे शार्टसर्किटमुळे घर जळून संसार उघड्यावर आलेला होता. अडचणीत असणाऱ्या पद्मिनी गाजाळे यांना उमेशशेठ भाकरे यांच्याकडून पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करून गृहउपयोगी वस्तू सामान आणण्यासाठी सढळ हाताने आर्थिक मदत केलेली आहे. ना मतासाठी, ना स्वार्थासाठी फक्त जनतेच्या जनहितासाठी सामाजिक कार्याचा वसा घेतलेले उमेश शेठ भाकरे जनतेसाठी सदैव तत्पर असतात.

पिसेवाडी गावातील सावंत वस्ती वार्ड क्र. २ मधील पद्मिनी गाजाळे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती. त्यामध्ये घरातील सर्व संसार उपयोगी भांडी, सामान, अन्नधान्य जळून खाक झालेले होते. अशा अडचणीच्या काळात उद्योजक उमेशशेठ लक्ष्मण भाकरे यांनी आर्थिक मदत केली. यावेळी पिसेवाडीचे माजी सरपंच धनंजय चव्हाण, नवनाथ रंगनाथ भाकरे, प्रकाश चांगदेव पवार, नूतन वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य रमेश लक्ष्मण भाकरे व कोमल प्रकाश पवार यांच्यासह सिद्धनाथ ग्रामविकास पॅनलचे सर्व मित्र परिवार यांनी जळीत ठिकाणी भेट देऊन पद्मिनी यांना आर्थिक सहकार्य करून मानसिक आधार दिलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng