पिसेवाडी गावातील स्मशानभूमीतील हातपंप, पथदिवे तात्काळ दुरुस्त करण्याची स्वाभिमानीची मागणी
अन्यथा हलगीनाद आंदोलन करण्याचा विधानसभा अध्यक्ष साहिल आतार यांचा इशारा…
पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी गावात हिंन्दु धर्मातील लोकांच्या अंत्यविधीसाठी उपयुक्त अशी एकमेव सार्वजनिक स्मशानभूमी असून त्या स्मशानभुमीत गेली चार साडेचार वर्षापासून हातपंप, पथदिवे, नादुरुस्त असून, यासह अस्वच्छतेचे साम्राज्य मोठया प्रमाणात वाढले आहे. त्याची साफसफाईसह अन्य दुरुस्ती तात्काळ करावी. अन्यथा पिसेवाडी ग्रामपंचायतीच्या समोर दि. १०/०८/२०२२ रोजी हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष साहील आतार यांनी दिले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, मौजे पिसेवाडी या गावची लोकसंख्या जवळपास ४००० एवढी असून हिंदू धर्मासाठी असलेल्या या गावातील स्मशानभूमीत सोईसुविधा या फक्त नाममात्र असून येथील हातपंप व पथदिवे दोन ते तीन वर्षांपासून बंद स्थितीमध्ये आहेत. याकडे आजपर्यंत ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. तसेच स्मशान भूमीतील साफसफाई ही कित्येक दिवसांपासून झाली नाही. हिंदू धर्मासाठी असलेल्या स्मशानभूमीची योग्य ती निगा न राखल्यामुळे कोरोना सारख्या अनेक रोगराईंना आमंत्रण दिले जात आहे. यावर त्वरित कारवाई होऊन स्मशानभूमीतील हातपंप, पथदिवे दुरुस्त करून सर्व सोयींनी उपलब्ध करून तसेच तेथील जागेची साफसफाई लवकरात लवकर करावी. अन्यथा ग्रामपंचायती समोर बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता हलगीनाद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी पिसेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी गावातील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह साहील आतार, दत्तात्रय सोपान गायकवाड, शिवाजी विठठ्ल वाघमारे, दादा महादेव म्हेत्रे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng