पिसेवाडी येथील मुरलीधर रामहरी गायकवाड यांच्या मृत्यूचे गुढ उलगडले जाईना, पोलिसांचा तपास सुरू.
मुरलीधर यांनी आजाराला कंटाळून स्वतः घात केला की, घातपात झाला ? तर्कवितर्क, चर्चा सुरू…
पूर्वीच्या काळी गावात मढं, पोलीस पाटील यांना कोडं, असे होते, मात्र पोलीस पाटील यांच्या वडिलांचे मृत्यूचे कारण अवघड, संपूर्ण गावाला पडलं कोडं…
पिसेवाडी ( बारामती झटका )
पिसेवाडी येथील सुसंस्कृत व सोज्वळ व्यक्तिमत्व असणारे मुरलीधर रामहरी गायकवाड यांचा दि. 04 जानेवारी 2023 रोजी संशयस्पद मृत्यू झालेला असल्याने गायकवाड यांच्या मृत्यूचे गुढ उलघडले जात नसून पोलीसांचा तपास सुरू आहे. पूर्वीच्या काळी एक म्हण प्रचलित होती, गावात मढं, पोलिस पाटील यांना कोडं, असे होते. मात्र पिसेवाडी गावचे पोलीस पाटील सुमंत मुरलीधर गायकवाड यांच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण सापडणे अवघड झालेले असल्याने संपूर्ण गावाला पडलं कोडं, अशी संदीग्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मुरलीधर रामहरी गायकवाड सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांना पत्नी, दोन मुले एक मुलगी आहेत. मुरलीधर यांना आजार होता, त्यांचा मृत्यू गळ्याला धारदार शस्त्राने इजा करून झालेला आहे. त्यांनी स्वतः घात करून घेतला की, घातपात झाला, अशा उलटसुलट चर्चा पिसेवाडी गावात सुरू होत्या. अशातच कोणीतरी निनावी पोलीसांना माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचे शवविच्छेदन केलेले होते. तपासाची चक्रे वेगाने फिरवूनसुद्धा मृत्यूचे गुढ अद्यापपर्यंत उलगडले नाही.
पंधरा दिवस झाले पोलिसांचा वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू आहे. गळ्याची जखम खोल असल्याने घातपाताचा संशय बळावत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचा उलगडा होणार आहे. पोलिसांच्या समोर मृत्यूचा उलघडा करणे मोठे आव्हान ठरलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng