पिसेवाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव सोहळ्या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम
पिसेवाडी (बारामती झटका)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव सोहळा २०२३ चे आयोजन क्रांतीसुर्य प्रतिष्ठान पिसेवाडी यांच्या वतीने दि. ९ एप्रिल २०२३ ते दि. ११ एप्रिल २०२३ पर्यंत पिसेवाडी शाळा, पिसेवाडी येथे करण्यात आले आहे.
दि. ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. १० एप्रिल २०२३ रोजी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्यावर जवळा येथील शाहीर सुभाष गोरे यांचा पोवाडा सायंकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत होणार आहे. दि. ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ वाजता पुतळा भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ६.३० भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त बांधवांनी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीसुर्य प्रतिष्ठान पिसेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng