पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकलूज शहर युवक कार्याध्यक्षपदी शहाजी खडतरे तर, महिला आघाडी शहराध्यक्षपदी जयश्री गायकवाड यांची निवड
अकलूज (बारामती झटका)
राष्ट्रीय अध्यक्ष लॉंगमार्च प्रणेते माजी खासदार जोगेंद्र कवाडे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (पीआरपीच्या) अकलूज शहर युवक कार्याध्यक्षपदी शहाजी खडतरे, तर महिला आघाडीच्या अकलूज शहराध्यक्षपदी जयश्री गायकवाड यांची निवड राज्य कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीप्रसंगी माळशिरस तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे व अकलूज शहराध्यक्ष मिलिंद पवार यांनी जाहीर केली.
दि. १ फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह, अकलूज येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी माळशिरस तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे व अकलूज शहराध्यक्ष मिलिंद पवार यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकलूज शहर युवक कार्याध्यक्षपदी शहाजी खडतरे, अकलूज शहर महिला आघाडी अध्यक्षपदी जयश्री गायकवाड, अकलूज शहर युवक सचिवपदी साजिद बागवान तर अकलूज शहर युवक संघटकपदी अशोक कोळी यांच्या निवडी जाहीर करून निवडीचे पत्र राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले वेळापूर ग्रामपंचायतचे सरपंच रजनिश बनसोडे व चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य सचिन सोनवणे यांचाही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव, तालुका सरचिटणीस गणेश गायकवाड, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख नवनाथ हुंबे, माळशिरस तालुका संघटक पांडुरंग चव्हाण, अकलूज शहराध्यक्ष मिलिंद पवार, शहर संपर्कप्रमुख शिवाजी खडतरे, अमोलराजे भोसले, अनिकेत शिंदे, समाधान लांडगे, दिलीप गायकवाड, दत्ता कांबळे, मुजीप बागवान, ऋषिकेश गायकवाड, मन्सूर काझी, विश्वास उघाडे, शिवाजी जाधव यांचेसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Fantastic perspective! The points you made are thought-provoking. For additional insights, check out this link: FIND OUT MORE. What do others think about this?