रिपाइं आठवले पक्ष माळशिरस तालुक्याचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

माळशिरस तालुक्यातील पक्षाच्या सभासद नोंदणीलाही जोरदार सुरुवात
माळशिरस (बारामती झटका)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष माळशिरस तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अकलूज यांना शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, दिव्यांग, भूमीहीन, दिनदलित, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये विधान भवनात गदारोळ घालणाऱ्या आमदारांना निलंबित करण्यात यावे, भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा नाही, असं बेताल वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवू नये व बजेटचा कायदा करण्यात यावा, राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्व महामंडळाचे अध्यक्ष नेमून मंडळांना पूरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण भागासाठी ३ लक्ष रुपये व शहरी भागासाठी ५ लक्ष रुपये करावा, महाराष्ट्रात होलार समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे, त्याचा विचार करून होलार समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोगारांची संख्या लक्षात घेता शासकीय भरती प्रक्रिया त्वरीत चालू कराव्यात, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, महात्मा जोतिबा फुले व साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणाऱ्या आरोपिंवर मोक्का अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.

या वरील सर्व मागण्यांचा जाणीवपूर्वक विचार करून शासन दरबारी मांडाव्यात व सर्व समाजातील घटकांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही लवकरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू असेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदनानंतर गेस्ट हाऊस याठिकाणी प्रमुख पन्नास पदाधिकाऱ्यांची सभासद नोंदणी करण्यासाठी आली, आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी वीस सभासद असे एकूण १०५० सभासद करणार असल्याचे बैठकीमध्ये ठरले. तालुका सरचिटणीस बादल सोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका कार्याध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

यावेळी मा. सरपंच राहुल वाघंबरे, युवक तालुकाध्यक्ष रविराज बनसोडे, युवक तालुका सरचिटणीस प्रेमसिंह कांबळे पाटील, तालुका सचिव प्रवीण वाघमारे, युवक तालुका उपाध्यक्ष अमोल वाघमारे, वेळापूर शहराध्यक्ष दादासाहेब गालफाडे, प्रीतम साळवे, आनंद सोरटे, विनित सोरटे, क्षितीज सोरटे, तोहित शेख, काळु गाडे, धनाजी साठे, शंकर सकट, दादा साठे, रोहित कांबळे, नागेश भोसले, योगेश चंदनशिवे, दिपक भोसले आदि पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



