पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार…
पुणे (बारामती झटका)
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाणार असल्याची गेल्या महिनाभरापासून जोरदार चर्चा होती. परंतु, सध्या तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार असल्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ध्वजवंदन करण्यात येते. स्वातंत्र्यदिनाचा ध्वजवंदन जिल्हा मुख्यालयात कोण करणार, याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर झाले आहे. तर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण होणार आहे.
दिलीप वळसे पाटील – वाशिम, हसन मुश्रीफ – सोलापूर, धनंजय मुंडे – बीड, छगन भुजबळ – अमरावती, अनिल पाटील – बुलढाणा, आदिती तटकरे – पालघर, धर्मराव आत्राम – गडचिरोली, संजय बनसोडे – लातूर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे. शिवसेना व भाजपच्या मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी होती. ती आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे पालकमंत्री म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी ध्वजवंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very engaging and funny! For more information, click here: LEARN MORE. Let’s chat!