पुरंदावडे ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी ठरणार का ? माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

ग्रामसभेत आठ विषय असून आणि ऐनवेळी येणाऱ्या विषयांमध्ये निकृष्ट विकास कामे व पालखी रिंगण सोहळ्याच्या हिशोबामध्ये गोंधळाचा रिंगण सोहळा होण्याची शक्यता ग्रामस्थांमधून वर्तवली जात आहे.
पुरंदावडे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील बहुचर्चित असणारी मौजे पुरंदावडे येथील ग्रामसभा गुरुवार दिनांक ३१/०८/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय पुरंदावडे येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदरच्या ग्रामसभेतील आठ विषय अजिंड्यावर आहेत. ऐनवेळी येणाऱ्या विषयांमध्ये ग्रामपंचायतीची सुरू असणारी निकृष्ट विकासकामे व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पालखी रिंगण मैदानासाठी आलेल्या शासकीय खर्चाच्या पालखी रिंगण सोहळ्याच्या हिशोबामध्ये गोंधळाचा रिंगण सोहळा होण्याची शक्यता ग्रामस्थांमधून वर्तवली जात आहे. यामुळे पुरंदावडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा वादळी ठरणार का ? याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामसभा होणार असल्याची दवंडी गावांमधून देण्यात आलेली आहे. फलकावर सभेची नोटीस चिटकवण्यात आलेली आहे. दवंडीचा आवाजाने पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेर नोकरी व उद्योग व्यवसायानिमित्त बाहेर असणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामसभेविषयी उत्सुकता लागलेली आहे. ग्रामसभा सुरू असताना थेट प्रक्षेपण झाल्यानंतर ग्रामसभा पाहता येईल असेही बाहेर गावच्या ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

पुरंदावडे ग्रामपंचायतीची मासिक मीटिंगसुद्धा खडाजंगी होत आहे. सध्या सत्ताधारी पार्टीकडे सरपंच व पाच ग्रामपंचायत सदस्य आहेत तर विरोधी गटाकडे सहा ग्रामपंचायत सदस्य आहेत. शासनाच्या सरपंच यांना दोन मताचा अधिकार असल्याने विरोधी गटाचे उपसरपंच पद शासनामुळे गेलेले आहे. समसमान होऊन चिठ्ठीद्वारे उपसरपंच झाले असते किंवा काहीही घडले असते. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीपासून गावामध्ये सदस्यांचा गोंधळ सुरू आहे ग्रामसभेत काय होते याकडे पुरंदावडे ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng