पुरंदावडे येथील माऊलींच्या गोल रिंगण सोहळ्यात प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे, भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
पुरंदावडे (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्याचे पुणे, सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात शुक्रवार दि. 23/06/2023 रोजी आगमन होत आहे. माळशिरस तालुक्यात पहिला मुक्काम नातेपुते येथे झाल्यानंतर माळशिरसकडे दुसऱ्या मुक्कामास माऊलींची पालखी जात असताना माळशिरस तालुक्यात पहिले गोल रिंगण पुरंदावडे, सदाशिवनगर येथे होत असते. मात्र, यावेळी प्रशासनाने सतर्क राहणे असून भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. पालखी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या भाविकांची अडचण होऊ नये, यासाठी पालखी महामार्गाचे विस्तारीकरण केलेले आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती केलेली आहे. पुरंदावडे येथील पालखी रिंगण सोहळ्याच्या बाजूने उड्डाणपुलाची प्लेटची निर्मिती केलेली असल्याने रस्त्याच्या मध्यभागी भिंत तयार झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील माळशिरस तालुक्यात पहिला गोल रिंगण सोहळा होत असल्याने अनेक वैष्णव व स्थानिक नागरिक नयनरम्य रिंगण सोहळा पाहण्यासाठी येत असतात. रिंगण सोहळा संपल्यानंतर दिंडीतील वारकरी यांना पुढील पालखी सोहळ्यातील वाटचाल करण्याकरता जावे लागते. पूर्वी रस्ता मोकळा असल्याने वारकरी व स्थानिक भाविकांना जाताना अडचण होत नव्हती. सध्या उड्डाणपूल झालेला असल्याने गर्दी होणार आहे, त्यामुळे प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे.
उड्डाणपूल झाल्यानंतर पहिल्यांदाच माऊलींचा रिंगण सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी शासनाचे लोकप्रतिनिधी म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून रिंगण सोहळा पाहून वारकरी व स्थानिक भाविकांना मार्गस्थ होताना कशाप्रकारे अडचणीला सामोरे जावे लागते हे पाहण्याकरता उपस्थित राहून परिस्थिती समजून घ्यावी. जर खरीच प्लेटच्या उड्डाणपूलाची अडचण भासली तर भविष्यात कॉलमचा उड्डाणपूल करण्यासाठी केंद्राकडे व राज्याकडे प्रस्ताव पाठवतील यासाठी, पालकमंत्री यांनी रिंगण सोहळ्यास उपस्थित राहावे, असे वारकरी व स्थानिक भाविक व नागरिक यांच्यामधून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng