निरा-देवधरच्या पाण्यासाठी निवडणूकावर बहिष्कार, बचेरी गावाने खा. रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांना दिले निवेदन …
बचेरी (बारामती झटका)
बचेरी ता. माळशिरस गावच्या शेतीला निरा-देवधर प्रकल्पाचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी बचेरी ग्रामस्थांनी सर्व निवडणूकावर बहिष्कार टाकला आहे. याबाबतचे निवेदन दि. 12/04/2023 रोजी कार्यतत्पर खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आले. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवेदन स्विकारुन याबाबत समाधानकारक ग्रामस्थांबरोबर केली. ग्रामस्थांनी बचेरी गावच्या वर्षानुवर्षे असलेल्या पाणी टंचाईचा पाढाच खासदार साहेबांपुढे वाचला. आज रोजी गावात पिण्यासाठी सुध्दा पाणी नाही, शासन टँकरची व्यवस्था करण्यात दिरंगाई करत आहे असे ग्रामस्थांनी सांगितले.

बचेरी गावच्या व्यथा ऐकून घेतल्यावर खासदार साहेबांनी माळशिरस तालुक्यातील बचेरीसह वंचित सर्व गावांना निरा-देवधरचे पाणी मी १००% मिळवून देणार, असे आश्वासित केले. निरा-देवधर मधील शिल्लक 1.6 टिएमसी पाण्यातून बचेरी व इतर गावाना पाणी मिळवून देणार असे ठामपणे सांगितले. तसेच निवडणूकांवर बहिष्कार टाकु नका, बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन खासदारांनी ग्रामस्थांना केले. शेतीला पाणी मी देणारच, असे मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले व ग्रामस्थांच्या आशा पल्लवित केल्या. त्याबद्दल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन मा. सरपंच महादेव माणिक पाटील व निरा-देवधर पाणी संघर्ष कृती समिती सदस्यांनी सत्कार केला.
या प्रसंगी आ. शहाजीबापु पाटील, चेतनसिंह केदार (तालुका अध्यक्ष भाजपा), उपसरपंच मोहन शिकारे, प्रा. सदाशिव शिंदे, माजी सरपंच सोमनाथ गाढवे, मा. सरपंच मच्छिंद्र थिटे, माजी चेअरमन मधुकर खेडेकर, बिराभाई शिंदे, वस्ताद माने, सुदाम शिंदे, विश्वजित गोरड, लहु माने, शिवाजी शिंदे, धनाजी शिकारे, संतोष खेडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng