Uncategorizedताज्या बातम्या

पुरवठा उपआयुक्त श्री. कुलकर्णी यांचा सन्मान सहकार महर्षी रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेकडून संपन्न…

सधन रेशन कार्डधारकांनी रेशन कार्डावरील धान्य सोडावे, योजनेला माळशिरस तालुक्यात उदंड प्रतिसाद

माळशिरस ( बारामती झटका )

तहसील कार्यालय माळशिरस येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटिल रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने पुरवठा उप आयुक्त श्री. कुलकर्णी साहेब यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष विजय मंडलिक यांच्यावतीने करण्यात आला.
पुरवठा उपआयुक्त श्री. कुलकर्णी साहेब यांनी माळशिरस तालुक्यामधील जे सधन रेशनकार्डधारक आहेत, ज्या रेशनकार्ड धारकांची परिस्थिती चागली आहे, अशा रेशनकार्ड धारकांनी स्वतः होऊन धान्य सोडावे, या योजनेला माळशिरस तालुक्यात उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. यामुळे गोरगरीब रेशनकार्ड धारकांना शासनाकडुन धान्य देता येईल.

परिस्थिती चांगली असताना किवा कुटुंबातील व्यक्ती नोकरीमध्ये आहे, अशा कुटुंबामधील सदस्य आयकर कर भरत आहेत. काही कुटुंबामध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आहेत, घरात चारचाकी, एक दोन वाहने आहेत, कुटुंबामध्ये पेन्शन धारक आहेत, बागायती शेती आहे, मोठे व्यावसायिक आहेत, असे इतर अनेक लोकांचे मोठे उत्पन्न असतानाही धान्य घेणे म्हणजे आपण शासनाची फसवणूक करण्यासारखे आहे‌. व ही बाब चुकीची आहे, असे धान्य घेणारे दिसून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

आपण धान्याचा हक्क सोडल्यामुळे दुसऱ्या एका गरीब रेशनकार्ड धारकाला धान्य देणे हे शासनाला सोईचे होणार आहे. त्यामुळे दि. 31 तारखेपर्यंत जे सधन रेशनकार्ड धारक आहेत, अशा रेशनकार्ड धारकांनी धान्याचा हक्क सोडवा, असे आवाहन पुरवठा उप आयुक्त श्री. कुलकर्णी साहेब यांनी केलेले होते.

यावेळी तालुक्यामधील 30 ते 35 रेशनकार्ड धारकांनी आमची परिस्थिती चांगली आहे व आम्ही सहखुशीने धान्य सोडत आहोत, असे सांगुन, धान्य नको म्हणुन स्वतः रेशनकार्ड धारकांनी आपले फार्म पुरवठा उप आयुक्त कुलकर्णी साहेब यांच्याकडे सादर करून धान्याचा हक्क सोडला, अशा सर्व रेशनकार्ड धारकांचा सत्कार पुरवठा उप आयुक्त कुलकर्णी साहेब यांनी केला.

यावेळी माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहसिलदार तुषार देशमुख, नायब तहसिलदार श्री. आशिष सानप, पुरवठा आधिकारी लोखंडे, पुरवठा निरक्षीक श्री. केमकर, गोदमपाल सलिम शेख, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष विजय मंडलिक वेळापुर, वैभव फडे, दयानंद शेळके, रणजितसिंह भगत, संजय खराडे, कुलकर्णी काका, मिलिंद रेडेकर, गणेश शिंदे, ऑपरेटर अनिल बडे, आझर मणेरी, आकाश कदम, अमिर तांबोळी, तालुक्यातील बहुतांश दुकानदार व धान्याचा हक्क सोडण्यासाठी आलेले तालुक्यामधील बहुसंख्य रेशनकार्ड धारक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button