पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांची बदली झाल्यापासून आमचा आता बरं चाललंय……
नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यात वाढ, नातेपुते पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सुस्त, अवैध धंदेवाले मस्त मात्र, सर्वसामान्य नागरिक व जनता त्रस्त
नातेपुते ( बारामती झटका )
सोलापूर ग्रामीणच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी अवैध व्यवसाय मटका, गुटखा, वाळू, जुगार यावर नियंत्रण ठेवलेले होते. स्थानिक पोलीस स्टेशन डोळे झाक करू नये, यासाठी भरारी पथकाची नेमणूक केलेली होती. भरारी पथक यांनी अनेकवेळा धाडी टाकून अवैध व्यावसायिक यांच्या मुस्क्या आवळल्या होत्या. मात्र, कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांची बदली होऊन त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आलेले आहेत. याचा परिणाम अवैध व्यावसायिकांवर चांगलाच झालेला आहे. सातपुते मॅडम यांची बदली झाल्यापासून अवैध व्यावसायिक म्हणतात, आमचं आता बरं चाललंय…

नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायामध्ये वाढ झालेली आहे. नातेपुते पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आर्थिक हित संबंधामुळे सुस्त आहेत. हद्दीतील लोकांना हप्ता दिलेला असल्याने अवैध धंदेवाले मस्त आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिक व जनता त्रस्त आहे. नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारू, मटका जुगार व अवैद्य वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे. नूतन पोलीस अधीक्षक सरदेशपांडे नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायाकडे लक्ष देतील का ?, असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मटका, दारू, गुटखा, जुगार व अवैध वाळू उत्खनन यामधून कोणत्या हद्दीतून किती व कोणता अधिकारी वसूल करतो याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लवकरच आकडेनिहाय नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिक यांचा पर्दाफाश होणार असून जनतेसमोर लेखाजोखा तयार केला जाणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng