पोस्को कायद्याविषयी उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे यांचे अनमोल मार्गदर्शन…
माळशिरस पंचायत समितीच्या सभागृहात अनेक महिलांसह मान्यवरांची उपस्थिती…
माळशिरस ( बारामती झटका )
शनिवार दि. 3 सप्टेंबर 2022 रोजी माळशिरस पंचायत समिती येथे माळशिरस तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक यांची मीटिंग घेऊन त्यांना अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे साहेब यांनी पोस्को कायदा, कोटपा कायदा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याबाबतीत घ्यावयाची दक्षता याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब व शिक्षण विभागातील अधिकारी व संबंधित शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती कांबळे मॅडम, पोलीस नाईक अनिल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल माने हे हजर होते.
यावेळी कायद्याबरोबर उपस्थित मुख्याध्यापक यांना आपल्या शाळेत काही अडचण असल्यास तात्काळ निर्भया पथकाशी संपर्क साधन्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng