Uncategorizedताज्या बातम्या

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन प्रामाणिकपणे नोकरीत उपमुख्य अभियंता पदापर्यंत मजल मारली – माजी आमदार रामहरी रुपनवर.

आजच्या तरुणांनी इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करा हमखास यश मिळते – उपमुख्य अभियंता भीमराव काळे

भांब ( बारामती झटका )

भांब सारख्या दुर्गम भागातून सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून सुरुवातीस कनिष्ठ अभियंता पदावर नोकरीस सुरुवात केली. प्रशासनात प्रामाणिकपणे नोकरी करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत मजल मारलेली ही, अभिमानाची गोष्ट आहे. अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती होत जावो, असे गौरोवोद्गार विधान परिषदेचे माजी आमदार ज्येष्ठ नेते ॲड. रामहरी रुपनवर यांनी उपमुख्य अभियंता भीमराव काळे यांच्या नागरी सत्काराच्या आयोजन प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना काढले. यावेळी प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर हे होते. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते गौतमआबा माने, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी व्हॉइस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट, नातेपुते सोसायटीचे चेअरमन अरुण पांढरे, गोरडवाडी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन खंडू तात्या कळसुले (पवार), वालचंद कोडलकर, हनुमंत कोडलकर, तुकाराम माने, छगन रूपनवर, विठ्ठल रूपनवर, संदीप वाडकर, बाळू वाडकर लासुर्णे, ज्ञानदेव वाघमोडे सर बारामती, युवा नेते धर्मराज माने, गिरवीचे सरपंच सुभाष सरगर, कण्हेरचे सरपंच पोपटराव माने, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक मारुती देशमुख, गोरडवाडी ग्रामपंचायतिचे सदस्य पांडुरंग पिसे, गुरुजन शंकरराव रणवरे सर, के. एल. रणवरे सर, शेलार सर मानकी, पी. एस. देशमुख सर इस्लामपूर यांच्यासह भांब पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भांब ता. माळशिरस येथील शेतकरी कुटुंबातील भीमराव संभाजी काळे यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण उर्फ म्हाडाच्या उपमुख्य अभियंता पदी पदोन्नती मिळाली आहे. भांब व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने उप मुख्यअभियंता पदावर बढती झालेले व अन्य विभागांमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा नागरी सत्कार रविवार दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी चार वाजता ग्रामदैवत संभाजी बाबा दरा, भांब येथे संभाजी बाबा दरा कुस्ती समितीचे रघुनाथ पांढरे, पंढरीनाथ काळे, सोपान काळे, शिवाजी पाटील, भानुदास शेंडगे, गोविंद शेंडगे, भीमा पांढरे, बबन रामा काळे, पोपट दाजीराम काळे, शिवाजी संभाजी काळे, बापू काळे, बापू मदने व समस्त भांब ग्रामस्थांनी आयोजन केलेले होते.

सत्काराला उत्तर देताना उपमुख्य अभियंता भीमराव काळे यांनी सांगितले कि, परिस्थिती कशीही असो स्वतःची स्वतःला प्रगती करावी लागते. स्पर्धा परीक्षेमध्ये आजच्या तरुणांनी इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करा, हमखास यश मिळते. मनामध्ये असणारा न्यूनगंड काढून टाका, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी शिक्षण घेऊन आपल्या परिवाराची व परिसराची उन्नती करणे गरजेचे आहे, असे मत उपमुख्य अभियंता भीमराव काळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी त्यांनी मनोगतामध्ये अनेक विषयांचा परामर्श घेतलेला होता.

भीमराव काळे व त्यांच्या परिवाराचा अल्पसा परिचय – भांब गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या डोंगर कपारीमध्ये वसलेले गाव आहे. अतिशय दुर्गम परिसर, डोंगर कपारीने वेढलेले भांब गाव आहे. अशा गावामध्ये शेतकरी व मेंढपाळ असणारे रखमाबाई व संभाजी काळे या दाम्पत्यांच्या पोटी भीमराव काळे यांचा जन्म दि. 01/06/1967 साली झालेला आहे. संभाजी काळे यांना निवृत्ती, भीमराव, शिवाजी, किसन अशी चार मुले तर मुक्ताबाई छगन रुपनवर फडतरी, कौसाबाई कोडलकर फोंडशिरस, कुसाबाई माने पळस मंडळ अशा तीन मुली होत्या.

संभाजी काळे यांची पूर्वीच्या काळी अतिशय प्रतिकूल व हलाखीची परिस्थिती होती. अशा कठीण व अडचणीच्या काळात भीमराव काळे यांनी पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांब येथे शिक्षण पूर्ण केले. पाचवी ते दहावी सदाशिवराव माने विद्यालय माणकी येथे शिक्षण पूर्ण केले. उर्वरित शासकीय विद्यानिकेतन अभियांत्रिकी कॉलेज कराड येथे डिप्लोमा पूर्ण केला. आणि 1987 साली वयाच्या विसाव्या वर्षी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण उर्फ म्हाडा मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले. त्यांनी कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, शाखा उप अभियंता, कार्यकारी अभियंता या पदावर काम केले असून सध्या भिमराव काळे यांना उपमुख्य अभियंता पदावर बढती मिळालेली आहे. भीमराव काळे यांनी नोकरी करीत 2007 साली डिग्री प्राप्त केलेली आहे, त्यामुळे त्यांना बढती मिळत गेली.

समाजामध्ये आपण पाहतो, ‘हम दो हमारे दो’ परंतु भीमराव काळे यांनी आपल्या परिवारातील शेतामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या भावंडांची मुले सुद्धा इंजिनियर करून स्वतःची मुले सुद्धा इंजिनियर केलेली आहे. भीमराव काळे यांचा मुलगा प्रज्वल व मुलगी वृषाली इंजिनीयर केलेले आहेत. सध्या वृषाली विवाहित आहे. ज्येष्ठ बंधू निवृत्ती यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांची दोन मुले व लहान बंधू शिवाजी यांचीही दोन मुले इंजिनियर केलेली आहेत. लहान बंधू किसन हे मुंबई पोलीस आहेत, त्यांची मुले शिक्षण घेत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे.

भीमराव काळे यांनी मुंबई येथे नोकरी करीत असताना परिवारावर ज्याप्रमाणे लक्ष दिले, त्याचप्रमाणे आपण ज्या परिसरामध्ये वाढलो, खेळलो त्या परिसराला सुद्धा विसरले नाहीत. ग्रामदैवत संभाजी बाबा दरा परिसर विकसित करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. पूर्वीच्या काळी संभाजी बाबा दरा येथे मोठ्या प्रमाणात कुस्ती मैदान सुरू होते. मात्र, सदरचे मैदान गेली पस्तीस वर्ष बंद होते. गावातील सहकाऱ्यांच्या सहकार्याने 2017 पासून पुन्हा संभाजी बाबा येथील कुस्ती मैदान भीमराव काळे यांच्या प्रयत्नाने सुरू झाले आहे. भांब परिसरामध्ये सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे उपमुख्य अभियंता पदावर बढती झाल्यानंतर संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन समिती व समस्त भांब ग्रामस्थ यांच्यावतीने भीमराव काळे यांना सन्मान चिन्ह व भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच वेळी प्रशासनामध्ये काम करणारे अनेक अधिकारी व कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये रामचंद्र धोंडीबा खरात, छगन दाजीराम काळे, जालिंदर दाजीराम काळे, तात्या बापू काळे सर गिरवी, अंबादास रामा काळे, दत्तू काका काळे, हनुमंत सिताराम काळे, आबा गंगाराम काळे, दादा शंकर गोरड, सोनबा नागू काळे, श्रीरंग भागुजी सिद, मधुकर दादा काळे, भगवान तात्याबा कांबळे, मधुकर गुंडीबा पांढरे, दिगंबर दादा काळे, शंकर खरात, विष्णू राघू काळे, अण्णा महादेव कांबळे, यांचाही सन्मान करण्यात आला आहे. संभाजी बाबा दरा कुस्ती संयोजन समिती व समस्त भांब ग्रामस्थ यांच्यावतीने योग्य व नेटके नियोजन करण्यात आलेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button