प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ई के वायसी करा व १४ वा हप्ता चालू ठेवा – सतीश कचरे, मंडळ कृषि अधिकारी
नातेपुते (बारामती झटका)
खरिप हंगाम उंबरट्यावर आला आहे. मान्सुनची चाहुल लागली आहे. शेतकरी राजाला बियाणे व खते खरेदीसाठी १४ वा पीएम किसान सन्मान निधी हप्ता गरजेचे आहे. यासाठी पीएफ किसान लाभधारक कुटूंब सदस्याने ई-केवायसी अद्द्यातनसाठी पीएम किसान पोर्टलवर बेनीफिसरी स्टॅटस मधून तपासणी करून खालील बाबीची पूर्तता करणे अनिवार्य आहे. जेणेकरून पात्र शेतकरी बांधव वंचीत राहणार नाहीत…
१) मा. तहसिलदार यांचे मदतीने राज्याच्या भुमि अभिलेख नोंदीप्रमाणे आवश्यक कागदपत्रे आधारे नोंदी अद्यावत करणे.
२) पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमधील ई-केवायसी ओटीपी आधारे सुविधेद्वारे ई केवायसी प्रमाणीकरण करणे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत सीएससी सेंटरवर ई-केवायसी करणे किंवा केंद्र शासनाच्या पीएफ किसान ॲपद्वारे फेस डिटेक्शनद्वारे ई-केवायसी अद्यायातन करणे त्यासाठी किसान पोर्टल WWW.PMKISAN.GOV.IN या संकेत स्थळाचा वापर करावा.
३) बँकेत जाऊन बॅक खात्यात आधार सलग्न करून किंवा पोस्टमास्टर यांचे मार्फत पेमेन्ट बँक खाते उघडावे.
वरील अत्यावश्यक ३ बाबींची पूर्तता केल्यानंतर पीएम किसान १४ वा हप्ता ऑनलाईन जमा होणार आहे, यांची शेतकरी बांधवांनी नोंद घेणे गरजेचे आहे. पीएम किसान गोल ॲपद्वारे फेस डिटेक्शन सुविधाद्वारे ई-केवायसी करणेसाठी खालील सुचनाचा वापर व पालन करावे. पीएम किसान पोर्टल किंवा गुगल पे स्टोअर किंवा प्ले स्टोअर वरून पीएम किसान गोल २.० हे ॲप व फेस RD ॲप डाऊनलोड करणे. अगोदर पूर्वीचे ॲप काढून टाकून ही नवीन ॲप डाऊनलोड करावे व खालील सुचनांचे पालन करून ई-केवायसी करावी. नवीन पीएम किसान गोल २.० ॲपमध्ये भाषा निवड करून पीए किसान नोंदणीकृत लाभार्थींनी लॉगिन करून आधार क्रमांक किंवा पीएम किसान नोंदणी क्रमांक टाकून बेनीफीसरी पर्याय निवड करून ओटीपी नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त करुन ओटीपी आधारे सहा अंकी एमपीनच्या माध्यमातून लॉगीन करून युवर केवायसी प्रलंबीत असा संदेश असेल तर ई-केवायसी पूर्ण करणेसाठी ई-केवायसी क्लीक करून एमपीनच्या आधारे तदनंतर कन्सेट फॉर्म वर क्लिक करुन स्कॅन फेस क्लीक करून मोबाईल चेहऱ्यावर प्रकाश दिसेल असा धरून स्कॅन फेस बटन क्लीक करून ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेबाबत संदेश येईल तोपर्यंत ॲप सुचनांचे पालन करून ई-केवायसी करावी.
इतर नोंदणीकृत नसलेल्या लाभार्थींना ई-केवायसी करावयांची असेल तर ईकेवायसी फॉर ऑदर बेनिफिसरीचा वापरून वरील कार्यपद्धती व सुचनांचे पालन करून ई-केवायसी करून १४ व्या सन्मान निधी वेळेवर प्राप्त करून घेणेचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे. अधिक माहिती कार्यपद्धती सुचना शंका निरसन व अँड्राईड मोबाईल नसलेल्या शेतकरी बंधूनी नजीकच्या कृषि विभाग ऑफीस अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Szia, meg akartam tudni az árát.