फक्त एका तासात मिटेल १२ वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद, जाणून घ्या महत्वाची माहिती

मुंबई (बारामती झटका)
राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी अनेक योजना राबवत असते. या सर्व योजनांचा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मात्र यामध्ये काही योजना अशा असतात की ज्या योजना विषयी शेतकऱ्यांना माहिती नसते. बऱ्याचदा जमिनीवरून भावकी असेल किंवा शेजारी असतील यांचे कायमच वाद होतात. यामुळे गुन्हे देखील घडल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
आता तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. याचाच एक भाग म्हणून खास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी Hello Krushi नावाच्या मोबाईल अँपची निर्मिती करण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणारे हे ॲप दोन मिनिटांत तुमची जमीन मोजून देते, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, भूनकाशा आदी बाबी तुम्हाला या ॲपवरून डाउनलोड करता येतात. इतकंच नाही तर रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज या गोष्टी तुम्हाला या अँपवर माहिती होतात. तेव्हा तुमचेही जमिनीचे वाद असतील तर हे ॲप तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. तेव्हा लागलीच मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअर ओपन करून हॅलो कृषी डाउनलोड करा.
मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बऱ्याच वेळा बारा वर्षांपूर्वी शेजारी व्यक्ती किंवा भावकितील जमिनीचा गट एकमेकांच्या नावे झाला तर त्यावर कोणताच उपाय निघत नाही. मात्र आता या समस्येवर उपाय निघाला आहे. आता फक्त एक तासांमध्ये बारा वर्षांपूर्वीचा शेत जमिनीचा जुना वाद मिटणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या सलोखा योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे.
बऱ्याचदा शेतकऱ्यांना जर जमिनीचे काही वाद असतील तर ते मिटवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे फेरे घालावे लागतात. मात्र अधिकाऱ्यांकडे फेरे घालून देखील हा वाद मिटत नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देखील खर्च होतात. मात्र आता शेतकऱ्यांसाठी यामध्ये एक आनंदाची बाब आहे. शेतकऱ्यांना आता फक्त एक हजार रुपये खर्च येणार आहे आणि एका तासात शेतकऱ्यांना त्यांची जमीन मिळेल, अशी माहिती मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी गोविंद गीते यांनी दिली आहे. मात्र अनेक जणांना सरकारच्या योजनेची माहिती नसल्यामुळे ही योजना सुरू होऊनही अनेक जण त्यांच्या लाभापासून वंचित राहत आहेत.
तुम्हालाही तुमच्या जमिनीचा जुना वाद मिटवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला गावात असणाऱ्या तलाठ्याकडे जाऊन सलोखा योजनेतून अर्ज करावा लागेल. या अर्जानंतर तलाठी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून दोघांच्या संमतीने जमिनीचा अहवाल मुद्रांक शुल्क विभागाला सादर केला जाईल. आणि तुमचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यात येईल. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांना सलोखा या योजनेबद्दल माहिती नाही. त्याचबरोबर अनेक अशा काही योजना आहेत, ज्याबद्दल शेतकऱ्यांना अजूनही माहिती नाही. जर तुम्हाला सर्व सरकारी योजनांविषयी माहिती घ्यायची असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा. हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्व सरकारी योजनांची अगदी अचूकपणे माहिती मिळेल. यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात, अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती आहेत ?, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला अगदी अचूकपणे मिळेल तीही अगदी मोफत. त्यामुळे लगेचच आपले Hello Krushi हे ॲप प्ले स्टोअर ला जाऊन इन्स्टॉल करा.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng