Uncategorizedताज्या बातम्यामनोरंजन

फडतरी येथे जय तुळजाभवानी यात्रेनिमित्त तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

देवी भक्तांच्या मनोरंजनासाठी सुप्रसिद्ध मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न होणार.

फडतरी ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील श्री भवानी मंदिर येथे जय तुळजाभवानी यात्रा महोत्सवानिमित्त सोमवार दि. ३/१०/२०२२ ते बुधवार दि. ५/१०/२०२२ पर्यंत भव्य कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेस तन-मन-धनाने सहकार्य करावे व सहभाग घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ फडतरी यांनी केलेले आहे.

सोमवार दि. ३/१०/२०२२ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत गजी ढोल कार्यक्रम, गोडवा नैवेद्य, आराधी मंडळींचा कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी समस्त ग्रामस्थांतर्फे भाविकांना महाप्रसादाची आयोजन देखील करण्यात आले आहे.

मंगळवार दि. ४/१०/२०२२ रोजी पहाटे ५ वा. भवानी मंदिरामध्ये देवीचा अभिषेक होणार आहे. सकाळी ११ वा. बकरी आहुती प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ८ वाजता महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणाऱ्या मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार दि. ५/१०/२०२२ रोजी पहाटे ५ वा. देवीचा छबिना व मिरवणूक निघणार आहे.

तरी सर्व भाविकांनी वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ फडतरी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button