फलटण तालुक्यात जनसेवेच्या माध्यमातून शिवसेना वृक्षारोपणाची चळवळ उभी करणार – प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख
फलटण (बारामती झटका)
अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीला धावत जाऊन त्यांना समस्यामुक्त करणे हाच आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील फलटण तालुका शिवसेनेचा दैनंदिन कार्यक्रम. फलटण तालुक्यात शिवसेना झपाटल्यासारखं सातत्याने लोकांच्या सेवेत अखंडपणे कार्यरत आहे हे कोणीही नाकारु शकत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. फलटण तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मागील पाच वर्षापासून फलटण तालुक्यात शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय अखंडपणे सुरु आहे. चार वर्षे झाली झणझणे यांचे सासवड येथे शिवसेना कार्यालय सुरु होते. नंतर मागील एक वर्षापासून फलटण शहरामध्ये आयसीआयसीआय बँकेसमोर मोनिता गार्डनमध्ये शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील जनतेच्या सेवेचं कार्य दमदारपणे सुरु असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
समस्या सोडवल्यानंतर मग ती वैयक्तिक असो वा सार्वजनिक असो, संबंधितांकडुन प्रत्येकी दोन झाडे लावुन घेण्याचा उपक्रम शिवसेनेने सुरु केला आहे. दोन झाडे लावण्याची संकल्पना ही साखरवाडी येथे राहणारे समीर खिलारे यांनी सुचवल्याचेही शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी आवर्जून सांगितले. वृक्षारोपण करणे ही मानवाची गरज झाली असुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे अत्यावश्यक झाले आहे.
झिरपवाडी येथील ग्रामस्थ रामचंद्र गुंजवटे हे काही दिवसापूर्वी त्यांची समस्या घेऊन शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आले होते. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची समस्या दुर केल्यानंतर त्याबदल्यात त्यांना दोन झाडे लावण्यासाठी सांगितले. त्यानुसार गुंजवटे यांनी झाडे आणली आहेत का, झाडे लावली आहेत का ? याची खात्री करण्यासाठी झिरपवाडी येथे रामचंद्र गुंजवटे यांच्या निवासस्थानी जाऊन समक्ष पाहणी केली व झाडे आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले. झिरपवाडी येथे भेटीदरम्यान शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेसह शिवसेनेत प्रवेश केलेल्या झिरपवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या रेखा नवनाथ गुंजवटे, अशोक गुंजवटे, ओंकार सरगर, अक्षय तावरे, रामचंद्र गुंजवटे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng