फुलचंद नागटिळक यांचा “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने गौरव
नगर (बारामती झटका)
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, नवनाथ विद्यालय व निमगांव वाघा, ता. जि. अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे महाराज जयंती निमित्त सोलापूर माढा, खैराव येथील फुलचंद नागटिळक (प्रति गाडगेबाबा) यांना अहमदनगर शहर लोकांना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सौ. ज्योती गडकरी यांच्या हस्ते “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे, औरंगाबाद येथील सहाय्यक अधिव्याख्याता डॉ. शैलेंद्र भणगे, बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या गुंफाताई कोकाटे, डॉ. विजय जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे, उपसरपंच अलका गायकवाड, शिवव्याख्याते अभय जावळे, शिवशाहीर विक्रम अवचिते, सौ. मंदाताई डोंगरे, कु. प्रतिभा डोंगरे, पै. संदिप नाना डोंगरे आदी उपस्थित होते.
फुलचंद नागटिळक यांचे गाडगेबाबांचा वेश परिधान करून गेल्या वीस वर्षांपासून आपले हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. गेली वीस ते पंचवीस वर्षापासून खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा संत गाडगेबाबा यांचा वेश घालून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रुढी, परंपरा, शिक्षण, शेती, पर्यावरण रक्षण, यातील समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या मार्गांचा अवलंब केला. त्यांनी “संत चोखाबा ते तुकोबा एक वारी समतेची” या वारीतून शेतकरी वाचवा, हरित वारी, समतेचा संदेश, मुलगी वाचवा, स्त्री जन्माचे स्वागत, गावोगावी स्वच्छतेचा संदेश देत सामाजिक समरसतेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात समाज प्रबोधनाचे, समाज जागृतीचे महान कार्य आपण करित आहात. त्यांनी दिलेल्या या बहुमूल्य योगदानाबद्दल “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng