फेस्टिव्हलमुळे मनोरंजनाबरोबर रोजगार निर्मिती होते – आ. संजयमामा शिंदे
टेंभुर्णी (बारामती झटका)
टेंभुर्णी फेस्टिव्हलसारख्या उपक्रमातून महिला व लहान मुलांचे मनोरंजन होते पण, यामध्ये जवळपास १५० दुकाने येतात. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे रोजगार निर्मिती होऊन अर्थचक्राला चालना मिळते, असे प्रतिपादन करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. ते बहुजन प्रतिष्ठानचे वतीने ५ ते १२ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या एकोणिसाव्या टेंभुर्णी फेस्टिव्हल या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचा उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. काल मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यावेळी उद्घाटक आ. संजयमामा शिंदे यांनी फेस्टिव्हल संयोजन समितीचे भरभरून कौतुक केले. सहकुटुंब, सहपरिवार मनोरंजन करण्याचे साधन म्हणून टेंभुर्णी फेस्टिव्हलकडे न पाहता शेकडो रोजगार निर्मितीचे ते माध्यम आहे. यामध्ये शेकडो स्टॉल, त्याचे मालक, कामगार, हॉटेल्स, त्यामधील कामगार, वेगवेगळ्या पाळण्यावर काम करणारे कारागीर, मंडपवाले, लाईट वाहनधारक, पेंटिंग प्रेस, अशा कितीतरी घटकांना याचा लाभ होत असतो. असे उपक्रमामध्ये सातत्य राहिल्याबद्दल वाघमारे बंधूचे विशेष कौतुक आमदार शिंदे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समिती सभापती भारतआबा शिंदे, माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे, माजी उपसभापती बंडूनाना ढवळे, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, पंचायत समिती सदस्य वैभवबापूू कुटे, नागनाथ भाऊ खटके पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रावसाहेबनाना देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिनबापू जगताप, सुधीरबापू महाडिक, सिद्धेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, करमाळा विभागाचे पोलीस उपाध्यक्ष डॉ विशाल हिरे, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनीही फेस्टिवलला भेट दिली. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक संयोजक रघुनाथ वाघमारे यांनी केलेे. सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद आखाडे व राजेंद्र मुळे यांनी केले तर फेस्टिवलचे अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी योगेश दाखले, विकास सुर्वे, गणेश पोळ, सोमनाथ नलवडे, प्रमोद कांबळे, शरददिन मुलाणी, झुंबर जाधव, हरिचंद्र गाडेकर, धनंजय भोसले, रणजीत येतात, रोहन जगताप, सौरभ वाघमारे, सहदेव मोरे, दशरथ कसबे आदींनी परिश्रम घेतले.
फेस्टिव्हलचे यंदाचे यशस्वी सलग १९ वे वर्ष असून हा महोत्सव टेंभुर्णी शहरासह संपूर्ण माढा तालुक्यातील नागरिकांचे मुख्य आकर्षण बनला आहे. कला, ज्ञान, विद्यान, मनोरंजन, कृषी व औद्योगिक प्रदर्शन, सामाजिक प्रबोधनपर, अंधश्रध्दा निर्मुलन यावर कार्यक्रमाचे आयोजन होत असून चालू वर्षी मोठ्या संख्येने सहकुटंब नागरिक फेस्टिव्हलला भेट देऊन आनंद घेताना दिसत आहेत. तर आठ दिवसात दीड लाखाहून अधिक नागरीक भेट देतात.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng