फोंडशिरस येथे धनगर समाज बांधवांच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा, आदर्श घ्यावा असा उपक्रम राबवला.
फोंडशिरस ( बारामती झटका )
फोंडशिरस ता. माळशिरस येथील धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून आदर्श घ्यावा, असा उपक्रम राबविलेला आहे. फोंडशिरसच्या शिरपेचामध्ये अहिल्यादेवींच्या स्मारकामुळे मानाचा तुरा रोवलेला आहे.
फोंडशिरस गावाला ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहे. या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावांमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. फोंडशिरस पंचक्रोशीत धनगर समाजाचे प्राबल्य आहे. फोंडशिरस चौकामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा छोटासा पुतळा होता.
अहिल्यादेवींच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त अनेक कार्यक्रम होत होते. बाहेर गावावरून अनेक व्याख्याते, कीर्तनकार यांचे कार्यक्रम पुण्यतिथी व जयंतीला होत असत. समाजाचे प्राबल्य असताना अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे स्मारक नसल्याची खंत व्यक्त होत होती. अशावेळी धनगर समाज बांधवांनी समाज वर्गणी करून सात ते आठ लाख रुपये खर्चून भव्य स्मारक उभा केलेले आहे. त्यासाठी धनगर समाज बांधवांनी १५-२० तरूणांची स्मारक समिती तयार केलेली होती. सदर तरुण मंडळींनी जेष्ठ नेते व समाज बांधवांच्या सहकार्याने भव्य आणि दिव्य पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng